आरोग्य

आर्मी राखीव हॉस्पिटलमध्ये विशेष कोविड वॉर्ड निर्मिती

महाराष्ट्रातील नाशिकचा समावेश

नवी दिल्ली : देशातील आर्मी हॉस्पिटलमध्ये विशेष कोविड वॉर्ड निर्मिती करण्यात येणार आहे. यात सर्वसामान्य नागरिकांवरही उपचार होतील. लखनौ, पटना, अहमदाबाद, नाशिक (ओझर) यासह देशातील काही शहरात हे हॉस्पिटल्स आहेत. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने कोविड आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना आर्मीकडून मदतीचा हात मिळणार आहे. याबाबत राजनाथ सिंह यांनी डिफेन्स सेक्रेटरीला आदेश दिले आहेत.

देशभरात कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढत असून आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. लोकांना जिवंतपणी प्राणवायू आणि बेड मिळवताना अडचणी येत आहेत, तर जीव गमावल्यानंतर स्मशानभूमीतही अंत्यसंस्कारासाठी रांगा लागत आहेत. या पार्श्वभूमीवर परिस्थितीत काहीशी सुधारणा करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. अशातच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी हा निर्णय घेतला आहे.

डीआरडीओ आणि एचएएल यांच्या कॅम्पसमध्ये ही कोविड हॉस्पिटल्स उभारणीचं काम जलदगतीने सुरू झालं आहे. देशातील आर्मीच्या ६३ हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीत दिल्या जाणाऱ्या डीआरडीओ फॅसिलिटी आधारावर ६३ हॉस्पिटलमध्ये कोविड वॉर्डची उभारणी केली जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button