शिक्षण

कोरोनाचा फटका : मे मध्ये होणाऱ्या सर्व ऑफलाइन परीक्षा लांबणीवर

NEET- PG परीक्षाही ४ महिने लांबणीवर

मुंबई : कोविड -१९ च्या दुसर्‍या लाटेमुळे शिक्षण मंत्रालयाने मे मध्ये नियोजित सर्व ऑफलाइन परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. यामध्ये फक्त ऑफलाइन परीक्षा पुढे ढकल्या जातील परंतु, ऑनलाइन परीक्षा या त्यांच्या वेळापत्रकानुसार सुरू ठेवल्या जाऊ शकतात.

कोरोनामुळे बोर्डाच्या परीक्षा जवळपास सर्व राज्यात रद्द केल्या आहेत. गेल्या २४ तासात कोरोनाचे ३ लाख ६८ हजार नवीन रुग्ण आढळले. तसेच ३ हजार ४१७ लोकांचा मृत्यू झाला आहे. या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन शिक्षण मंत्रालयाने मे मध्ये होणाऱ्या सर्वच ऑफलाइन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

NEET- PG परीक्षाही ४ महिने लांबणीवर

कोरोनाच्या वाढत्या संकटाची परिस्थिती पाहाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. पंतप्रधान कार्यालयाच्या म्हणण्यानुसार वैद्यकीय कर्मचार्‍यांची उपलब्धता वाढवण्यासाठी पंतप्रधानांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या निर्णयांपैकी एक निर्णय म्हणजे NEET-PG परीक्षेला कमीत कमी 4 महिने पुढे ढकलले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोविडमध्ये आपले कर्तव्य पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय कर्मचार्‍यांना शासकीय भरतींमध्ये प्राधान्य दिले जाईल. मेडिकल इंटर्न्सला त्यांच्या शिक्षकांच्या देखरेखीखाली कोविडच्या व्यवस्थापनासाठी तयार केले जाईल. MBBS च्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना माईल्ड कोविड रुग्णांच्या टेली कंसल्टेशन आणि मॉनिटरिंगचे काम दिले जाईल. विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांच्या देखरेखीखाली हे काम करतील. तर BSc/GNM पात्र परिचारिका वरिष्ठ डॉक्टर आणि परिचारिकांच्या देखरेखीखाली पूर्णवेळ कोविड नर्सिंग ड्यूटीमध्ये काम करतील. कोविड ड्युटीमध्ये गुंतलेले वैद्यकीय कर्मचारी त्यांचे १०० दिवस काम पूर्ण करतील, तेव्हा त्यांना पंतप्रधानांच्या प्रतिष्ठित कोविड राष्ट्रीय सेवा पुरस्काराने गौरविण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button