आरोग्य

रुणवाल ग्रीन्सच्या सेडार टॉवरमधील नागरिकांना कोरोनाचा धोका

Corona threat to civilians at Runwal Greens' Cedar Tower

मुंबई : मुलुंडमधील रुणवाल ग्रीन्सच्या सेडार टॉवरमधील नागरिकांना कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. या इमारतीतील कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आरोग्याची काळजी न घेता सर्रासपणे सार्वजनिक लिफ्टचा वापर करताना, परिसरात फिरताना आढळून येत आहेत. त्यामुळे इमारतीतील अन्य रहिवाशांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणावर वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन करण्याच्या चर्चा सुरू आहेत. मुंबईतही निर्बंध अधिक कडक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असताना मुलुंडमध्ये सेडार टॉवरमध्ये राहणारे आणि स्वत:ला सुशिक्षित म्हणविणारे काही नागरिक मात्र अत्यंत बेजबाबदारपणे वागत असून आपल्यासोबत इमारतीतील अन्य नागरिकांच्याही आरोग्याला धोका निर्माण करताना दिसत आहेत. मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने कोविड रुग्णांसाठी आखून दिलेल्या नियमांचे पूर्णपणे उल्लंघन या परिसरात होत आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या बेजबाबदारपणाचा फटका सेडार टॉवरमध्ये राहणाऱ्या सुमारे १८०० फ्लॅटसमधील अन्य नागरिकांना बसून समूह संसर्ग होण्याचा धोका वर्तविला जात आहे. याबाबत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी तत्काळ अशा कोरोना पॉझिटीव्ह नागरिकांना सक्तीच्या विलगीकरणात पाठवावे आणि अन्य नागरिकांना निर्माण झालेला धोका टाळावा, अशी मागणी होत आहे. याबाबत तत्काळ पावले न उचलल्यास मुंबई महानगरपालिकेकडे तक्रार करून कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचे फ्लॅटस् तत्काळ सील करावे लागतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

——–

Corona threat to civilians at Runwal Greens’ Cedar Tower

Mumbai: Citizens in the Cedar Tower of Runwal Greens in Mulund are at risk of corona. Corona-positive patients in the building are found walking around the area, using public lifts extensively without caring about health. This has created an atmosphere of fear for other occupants of the building as well, increasing the risk of corona infection.

The prevalence of corona in Maharashtra is on the rise. So discussions are underway to lockdown in the state. Restrictions are also expected to be tightened in Mumbai. However, some citizens living in the Cedar Tower in Mulund and calling themselves educated are behaving very irresponsibly and endangering the health of other citizens in the building. The rules laid down by the Mumbai Municipal Corporation and the state government for Covid patients are being completely violated in the area. The irresponsibility of corona-infected patients has hit other citizens living in about 1,800 flats in the Cedar Tower at risk of becoming infected. In this regard, it is demanded that the office bearers of the society should immediately send such corona positive citizens for forced isolation and avoid any danger to other citizens. If immediate steps are not taken in this regard, the flats of Corona positive patients will have to be sealed immediately by filing a complaint with the Mumbai Municipal Corporation.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button