बेड मिळत नसल्याने ऑक्सिजन सिलेंडरसह आंदोलन करणाऱ्या कोरोना रुग्णाचा मृत्यू
नाशिक: नाशिक महापालिका क्षेत्रातील हॉस्पिटलमध्ये बेड मिळावा यासाठी कोरोनाबाधितानं आंदोलन केलं होते. बुधवारी संध्याकाळी महापालिका मुख्यालयात रुग्णानं ऑक्सिजन सिलेंडरसह ठिय्या मांडला होता. संबंधित कोरोना रुग्णाच्या आंदोलनानं महापालिका परिसरात खळबळ माजली होती. आंदोलनानंतर पालिका प्रशासनानं त्या रुग्णाला बिटको रुग्णालयात रुग्णालायात दाखल केलं होतं. महापालिका प्रशासनानं ऑक्सिजन बेडसह आंदोलन करणाऱ्या व्यक्तीला बिटको रुग्णालयात दाखल केलं होतं. मध्यरात्री बिटको रुग्णालयात संबंधित रुग्णाचा मृत्यू झाला.
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट आल्याचं चित्र आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका मोठ्या शहरांना बसल्याचं दिसून आलं आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेतील त्रुटी समोर आणणाऱ्या घटना समोर येत आहेत. नाशिक महापालिकेत ऑक्सिजन सिलेंडरसह बुधवारी आंदोलन करणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात बेड मिळत नसल्यानं महापालिका मुख्यालयात रुग्णानं आंदोलन केलं होतं. कोरोनाबाधित रुग्णाला आंदोलन करण्यासाठी महापालिकेत आणणाऱ्या व्यक्तींवर पालिकेकडून कारवाई होणार आहे. बेड मिळत नसल्याने संबंधित रुग्णाला महापालिकेत आणणाऱ्या व्यक्तींवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.