स्पोर्ट्स

‘आयपीएल’वर कोरोनाचं संकट; वानखेडे स्टेडियममधील ८ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

मुंबई: देशात कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. ‘आयपीएल’वर कोरोनाचं सावट असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहे. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनंतर आता 8 जणांचे कोरोना रिपोर्ट एकसाथ कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं आता मोठी खळबळ उडाली आहे. ‘आयपीएल’चे सामने 8 संघ आणि 6 शहरांमध्ये होणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमची खबरदारी घेणाऱ्या 8 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. वानखेडे स्टेडियमवर 10 एप्रिल ते 25 एप्रिल आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत. त्याआधीच 8 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार KKR चा फलंदाजाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वांचा चाचण्या करण्यात आल्या. त्याच दरम्यान 8 जणांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. 9 एप्रिलपासून ‘आयपीएल’चा 14 वा हंगाम सुरू होत आहे. या हंगामावर कोरोनाचं संकट असल्यानं चिंतेची बाब आहे. मागच्या आठवड्यात वानखेडे स्टेडियममधील 19 जणांची RTPCR चाचणी करण्यात आली होती. या चाचणीमध्ये पहिले 3 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले. तर 1 एप्रिल रोजी 5 जणांना संक्रमण झाल्याची माहिती मिळाली आहे.

‘आयपीएल’ सुरू होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. खेळाडूंना देखील कोरोनामुळे कडक नियमावली पाळण्याची सूचना देण्यात आली आहे. याआधी कोलकाता नाइटरायडर्स संघातील नीतीश राणा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. दोन दिवसांपूर्वी KKRकडून राणाचा रिपोर्ट निगेटीव्ह आला असल्याची माहिती दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button