अर्थ-उद्योग

महाराष्ट्रात मॅकडोनाल्‍ड्स इंडियाची पहाटे ३ पर्यंत कॉन्टॅक्टलेस मॅकडिलिव्हरीची सुविधा

मुंबई : कोविड-१९ चा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्रामध्ये जारी झालेल्या नव्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर वेस्टलाइफ डेव्हलपमेंट लि.च्या मालकीची मॅकडोनाल्‍ड्स रेस्टॉरंट्स मुंबईतील काही निवडक स्टोअर्समधून पहाटे ३ वाजेपर्यंत कॉन्टॅक्टलेस मॅकडिलिव्हरी सेवा पुरवणार आहे. कोविड-१९ चा मोठ्या प्रमाणात वाढत असलेला संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्याने नवे निर्बंध घोषित केले असताना, ब्रँड आपल्या मॅकडिलिव्हरी, टेकअवे आणि ऑन-द-गो या सोयीच्या पर्यायांचा आवाकाही दुपटीने वाढविणार आहे. मॅकडोनाल्‍ड्स इंडियाने (पश्चिम आणि दक्षिण) आपल्या गोल्डन गॅरंटी प्रॉमिसच्या माध्यमातून ग्राहकांचा या ब्रँडवरील विश्वास टिकवून ठेवण्यासाठी सुरक्षितता आणि स्वच्छतेच्या कठोर उपाययोजना आधीच अंमलात आणल्या आहेत.

मॅकडोनाल्‍ड्स इंडिया पश्चिम आणि दक्षिणचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सौरभ कारला म्हणाले, “पॅनडेमिकला नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या प्रयत्नांना आमचा पाठिंबा आहे. आमच्या लेट नाइट सेवेच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांना सुरक्षित, स्वच्छ आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ अखंडितपणे पुरवित राहू शकतो याचा आम्हाला आनंद आहे.”

ते पुढे म्हणाले, “गेल्या वर्षातील घडामोडींमुळे ग्राहकांच्या अपेक्षांनी नवे रूप घेतले आहे आणि आता त्यांना आपल्या खात्रीच्या ब्रँडशी सुरक्षित आणि सोयीस्कर पद्धतीने संपर्क साधायचा आहे. आमच्या ओम्नी-चॅनल अर्थात वेगवेगळ्या मार्गांनी सेवा पुरविण्याच्या धोरणाच्या माध्यमातून आम्हाला ग्राहकांची मागणी पूर्ण करता आली आहे व मॅकडोनाल्‍ड्सचे पदार्थ ग्राहकांना ते जिथे कुठे असतील तिथे, त्यांना हवे तेव्हा आणि त्यांना हव्या त्याप्रकारे उपलब्ध करून देता आले आहेत.“

ग्राहक आणि कर्मचारी यांच्या संपूर्ण सुरक्षिततेची हमी देण्यासाठी तयार करण्यात आलेली ४२ कलमी सूची अर्थात गोल्डन गॅरंटी प्रॉमिसचा एक भाग म्हणून वेस्टलाईफने याआधीच आपल्या सर्व रेस्टॉरंट्समध्ये डिलिव्हरी, टेकअवे, ड्राइव्ह थ्रू आणि ऑन द गो सेवांसाठी सुरक्षितता आणि स्वच्छतेचे अत्यंत काटेकोर नियम अंमलात आणले आहेत. सर्व आउटलेट्समध्ये सर्व कर्मचा-यांच्या शरीराचे तापमान तपासले जाते, डिलिव्हरी आणि टेकअवे ऑर्डर्स घेण्यासाठी व पूर्ण करण्यासाठी रेस्टॉरंट्सच्या आत व बाहेर निर्धारित सोशल डिस्टन्सिंगच्या खुणा करण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button