स्पोर्ट्स

‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी आर. अश्विन, मिताली राजची शिफारस

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) देशातील खेळाडूंसाठी सर्वांत मानाचा पुरस्कारांपैकी एक असणाऱ्या खेल रत्न पुरस्कारासाठी भारताची दिग्गज महिला क्रिकेटपटू मिताली राजसह फिरकीपटू आर. आश्विनच्या नावाची शिफारस केली आहे. यासोबतच अर्जुन पुरस्कारासाठीही तिघा युवा क्रिकेटपटूंची नावे बीसीसीआयने सूचवली आहेत. यामध्ये जसप्रीत बुमराह, के. एल. राहुल आणि शिखर धवन यांच्या नावांचा समावेश आहे. २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय खेल दिवसाचे औचित्य साधून या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

देशांसाठी क्रिडा क्षेत्रात उल्लेखणीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सम्मान करण्यासाठी खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कारासारखे पुरस्कार दिले जातात. त्यासाठी ठराविक वेळेत केलेल्या अप्रतिम कामगिरीवर क्रिडापटूंची निवड केली आहे. दरम्यान बीसीसीआयने यंदाच्या पुरस्कारांसाठी १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान अप्रतिम कामगिरी केलेल्या खेळाडूंची नावे पुरस्कारासाठी सूचविली आहेत.

महिला क्रिकेटपटू मिताली राजने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत २२ वर्षे पूर्ण केली. सचिन तेंडुलकरनंतर इतका काळ खेळलेली ती दुसरी भारतीय क्रिकेटपटू आहे. तसेच महिलांच्या एकदिवसीय सामन्यांतही सर्वाधिक धावा मितालीच्याच नावावर आहेत. तर दुसरीकडे आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये मागील बऱ्याच वर्षांपासून भारतीय गोलंदाजीची मदार पेलली आहे. त्याने नुकत्याच ४०० विकेट्सा टप्पाही पार केला. तसेच आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ७१ विकेट्स घेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाजही ठरला. तसेच बुमराह, धवन आणि राहुल यांचीही मागील काही वर्षातील कामगिरी उल्लेखणीय असल्याने अर्जुन पुरस्कारासाठी त्यांची शिफारस करण्यात आली आहे.

खेल आणि युवा कल्याण मंत्रालयद्वारा पुरस्कारांसाठी नामांकन पोहोचवण्याची शेवटची तारीख ५ जुलै आहे. दरम्यान मंत्रालयाने क्रिकेटसह हॉकी इंडियाकडून गोलकीपर पीआर श्रीजेशचे नाव खेल रत्न आणि हरमनप्रीत सिंह, वंदना कटारिया आणि नवज्योत कौर यांचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित केले आहे. तर भारतीय अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनने ओडिशा सरकारकडून धावपटू दुती चंदचे नाव खेल रत्न पुरस्कारासाठी सूचवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button