शिक्षण

सीबीएसई बोर्डाचा १२ वीचा निकाल ९९.३७ टक्के

नवी दिल्ली: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशन (सीबीएसई) ने शुक्रवारी १२ वी बोर्डाचा निकाल जाहीर केला. सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in यावर हा निकाल जाहीर झाला आहे. यंदा ९९.३७ टक्के विद्यार्थी पास झाले असून, हा आतापर्यंतचा हायएस्ट पासिंग परसेंट आहे. तर, ६१४९ (०.४७) विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, परीक्षेत परत एकदा मुलींनी बाजी मारलेली दिसत आहे. यंदा मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा ०.५४% ने जास्त आहे. यंदाच्या परीक्षेत ९९.६७ मुली तर ९९.१३ टक्के मुलं पास झाली. सलग सहाव्या वर्षी मुलींना बाजी मारलेली आहे.

निकाल पाहण्यासाठी सीबीएसईची अधिकृत साइट cbseresults.nic.in वर जाऊन १२ वी CBSE Results 2021 लिंकवर क्लिक करा. त्यानंतर लॉगइन करुन आपला निकाल पाहता येईल. विद्यार्थी यावरुन निकालाची प्रिंटदेखील काढू शकतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button