राजकारण

अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी सीबीआयचे पथक मुंबईत दाखल

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या प्राथमिक चौकशीसाठी हायकोर्टाने सीबीआयला १५ दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे अनिल देशमुखांची चौकशी करण्यासाठी सीबीआयचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. त्यामुळे आज अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी होणार आहे. या प्रकरणी परमबीर सिंग यांचाही जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे. सीबीआयच्या पथकात चार इन्स्पेक्टर रँकचे अधिकारी आहेत. यात स्थनिक सीबीआय अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. यासाठी स्थानिक सीबीआय अधिकाऱ्यांची टीम बनवली जाणार आहे. आणि पुढील तपास सुरु केला जाणार आहे.
या प्रकरणात ज्यांची नावे आहेत त्यांचीही चौकशी केली जाणार असून जबाब नोंदवला जाणार आहे.

अनिल देशमुखांविरोधातील आरोपांबाबत सीबीआय चौकशी करण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात दोन याचिका दाखल झाल्या होत्या. एक याचिका अनिल देशमुख यांनी तर दुसरी याचिका राज्य सरकारच्यावतीने करण्याता आली होती. दरम्यान याप्रकरणात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख्यांविरोधात केलेल्या आरोपांसंबंधीत याचिकेवर सुनावणी देत मुंबई हायकोर्टाने देशमुखांविरोधातील आरोप योग्य आहे किंवा नाहीत याबाबत प्राथमिक चौकशी करण्यासाठी सीबीआयला १५ दिवसांची मुदत दिली आहे.

हायकोर्टाच्या सीबीआय चौकशीच्या आदेशानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. दरम्यान देशमुख यांना सुप्रीम कोर्टात जाण्याचे मार्गही बंद झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून देशमुख यांच्या बचावासाठी प्रयत्न केले जात आहेत. याप्रकरणावर हायकोर्टाने सांगितले की, हे प्रकरण असाधारण आणि अभूतपूर्व असल्याने याची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे. तर उच्च न्यायालयाने यावर ५२ पानांचा आदेश सांगितले की, अनिल देशमुखांवर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे नागरिकांमध्ये राज्यातील पोलीसांच्या प्रतिमेला ठेच पोहचल आहे. परमबीर सिंह यांनी २५ मार्चला अनिल देशमुखांविरोधात याचिका दाखल करत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. या याचिकेत सिंह यांनी अनिल देशमुखांवर भष्ट्राचारासह अनेक गंभीर आरोप केले आहेत. यात अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेसह अन्य पोलीस अधिकाऱ्यांना मुंबईतील बार, रेस्टॉरंसमधून दरमहा १०० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते. असे नमुद करण्यात आले आहे. यातील सचिन वाझेंना अंबानी यांच्या एंटिलिया बंगल्याबाहेर स्फोटकाप्रकरणी मुख्य आरोपी म्हणून एनआईएने अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button