मुंबई : राज्यात काही दिवसांवर महानगरपालिकेच्या निवडणुका ठेपल्या आहेत. राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप तयारीला लागली आहे. या संदर्भात भाजपच्या कोअर कमिटीत येणाऱ्या पालिका निवडणुकासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली असून मुंबई पालिका निवडणुकीसाठी आशिष शेलार यांना जबाबदारी देण्यात आली. या बैठकीत जिल्हानिहाय जबाबदारीचे वाटप भाजप नेत्यांना देण्यात आले.
मुंबई महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढणार आहे. शिवसेनेच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेची जबाबादारी आशिष शेलार यांना देण्यात आली आहे. सध्या मुंबई महानगरपालिकेत भाजपचे ८३ नगरसेवक आहेत.
जिल्हानिहाय जबाबदारी : ठाणे महानगरपालिका – निरंजन डावखरे, नागपूर महागरपालिका – सुधीर मुंनगंटीवार, उल्हासनगर महापालिका – कुमार ऐलानी, कोल्हापूर महापालिका – धनंजय महाडीक, सोलापूर महापालिका – विजय देशमुख, पुणे महानगरपालिका – राजेश पांडे, चंद्रपूर महापालिका – चंद्रशेखर बावनकुळे, पिंपरी महानगरपालिका – माधुरी मिसाळ, नाशिक महापालिका – गिरीश महाजन, सहप्रभारी महापालिका – प्रभारी जयकुमार रावल, औरंगाबाद महापालिका – डॉ. भागवत कराड, लातूर महापालिका – संभाजी निलंगेकर, परभणी महापालिका – बबनराव लोणीकर, लातूर महापालिका – संभाजी निलंगेकर, अकोला महापालिका – रणधीर सावरकर,
मुंबई महापालिकेचा कारभार नगरसेवक व प्रशासनाच्या माध्यमातून चालवण्यात येतो. मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता असून 7 मार्चला मुंबई महापालिकेची मुदत संपुष्टात येत असल्याने मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमण्यात येणार आहे.