शिक्षण

बालभारतीकडून कोट्यवधींची पुस्तके रद्दीत !

पुणे : बालभारतीकडून जुने पुस्तके रद्दीमध्ये काढली जात आहेत. अभ्यासक्रम बदलल्यानंतर ही प्रक्रिया करावी लागते. मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे बालभारतीने छापलेली पुस्तके गोदामाताच पडून आहेत आणि आता ही पुस्तके रद्दीत विक्रीला काढली आहेत. या पुस्तकांमध्ये कुठलेही नवीन अभ्यासक्रमाचे पुस्तक नाहीत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु न झाल्याने बालभारतीकडून ४२६ मेट्रिक टन पुस्तके रद्दीत विक्रीला काढली आहेत. बालभारतीने नव्याने छापलेली लाखोंच्या संख्येने पुस्तके राज्यातील ९ विविध ठिकाणच्या गोदामात पडून आहेत. यामध्ये पुणे, नागपूर, मुंबई, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, अमरावती, पनवेल आणि नाशिक येथील बालभारतीच्या गोदामांचा समावेश आहे. या सर्व गोदामांत पडून असलेली पुस्तके आता रद्दीत काढण्यात येणार आहेत. अभ्यासक्रम बंद होऊन दोन वर्षे झाली आहेत त्यामुळे ही पुस्तके गोदामांत पडून आहेत. अभ्यासक्रम बदलल्या नंतर ही पुस्तके क्लपिंग केली जातात त्याचा लगदा केला जातो ही पुस्तकं कोणालाही दिली जात नाहीत. याची जाहिरात काढून ही पुस्तक रद्दीत विकून टाकले जातात. पुस्तके रद्दीत विक्रीसाठी काढण्यासाठी बालभारतीकडून जाहिरातही काढण्यात आलीय. दर तीन वर्षांनी ही प्रक्रिया करतो, अभ्यासक्रम बदलल्यानंतर उरलेली ही पुस्तके आहेत. तसेच काही पुस्तके मुद्रण दोष असलेली आहेत अशी माहिती बालभारतीचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button