शिक्षण

स्पायसर शाळेत पालकांचे आंदोलन, यश साने यांच्या उपस्थितीत शाळा प्रशासनाशी चर्चा

पिंपरी-चिंचवड : आज सकाळी सकाळी अचानक पुण्यातील औंधच्या स्पायसर शाळेत पालकांचं आंदोलन सुरू झालं. शाळेत अनेक पालकांनी ठिय्या मांडला, गेल्या अनेक दिवसांपासून फी व इतर काही मागण्या शाळेकडे सतत करून देखिल त्याला दाद दिली जात नव्हती. म्हणूनच आज सगळ्या पालकांनी एकत्रित शाळेत ठिय्या मांडण्याचा निर्णय घेतला. शाळा प्रशासन व पालकांमध्ये आरोप प्रत्यारोप सूर झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष यश दत्ताकाका साने यांनी या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी उपस्थिती लावली. आंदोलन करणाऱ्या अनेक पालकांनी या शाळेच्या बद्दल आधीच अनेक तक्रारी होत्या.आंदोलनाप्रसंगी काही पालकांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष यश साने यांच्याशी संपर्क केला असता क्षणाचाही विलंब न करता ते घटनास्थळी हजर झाले. यश साने यांनी पालक व शाळा प्रशासन यांच्याशी चर्चा केली. पालकांच्या मागण्या मान्य करा व फी कमी करा ही प्रमुख मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शाळेस करण्यात आली.

यश साने व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने देखिल या आंदोलनास पाठिंबा दिल्याने पालकांचे मनोधैर्य वाढले तसेच शाळा प्रशासन नरमले. शाळा प्रशासनातर्फे मागण्यांचा सकारात्मक विचार करू व मागण्या मान्य होतील असे आश्वासन देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसात महाविद्यालयात लॉकडाऊनमध्ये आकारल्या जाणाऱ्या फी संदर्भात यश साने यांच्या नेतृत्वात महाविद्यालयाना निवेदने सुध्दा दिली गेली होती. त्यात आज हया शाळेच्या फी संदर्भात प्रश्न आणि यश साने यांची उपस्थिती यामुळे अनेक पालकांनी त्यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button