नाशिकमध्ये २०१३ मध्ये विवेकानंद जगदाळे यांनी स्पर्धा भरवली होती. या स्पर्धेचे स्वरुप वाढवण्याची विनंती केली. या स्पर्धा मुक्कामी करण्याचे आवाहन जगदाळेंनी स्वीकारले आणि दोन-दोन दिवसांच्या स्पर्धेचे नियोजन सुरु केले. यासाठी जगदाळेंनी खऱ्या अर्थाने आर्थिक भार पेलला. संपूर्ण महाराष्ट्रातून वकिलांचा ग्रुप तयार झाला. अनेक वरिष्ठ वकील, निवृत्त न्यायाधीशही सहभागी झाले. अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले आणि मग दरवर्षी महाराष्ट्रात कुठे ना कुठे सामने खेळले जावू लागले. त्यानंतर सांगलीत जगदाळे आणि प्रशांत जाधव यांनी धाडसी प्रयोग करीत याला वेगळे स्वरुप दिले. पुढे हाच धागा पकडत पवन कुलकर्णी आणि जयराज गौंड यांनी या स्पर्धेला ‘आयपीएल’च्या रांगेत बसवले. या दोघांनी पुण्यात दोन वर्षे अत्यंत नेटके नियोजन केले होते. यंदा जगदाळेंनी ही स्पर्धा नाशिकमध्ये घेण्याचे ठरवले. यावेळी टीमही वाढवल्या आणि त्यामुळे अधिकाधिक वकील खेळाडूंना खेळण्याची आणि टीममध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यामुळे नाशिकची ‘एमएपीएल’ही पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात होत आहे. वकिलांच्या क्रिकेटला लौकिक मिळवून देण्यात जगदाळेंचे योगदान खूप मोठे आहे. त्यांना नाशिकच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून अॅड. रवींद्र जानकर, अॅड उदय वारुंजीकर, प्रसाद वासकर, भूषण साळवी, गणेश कवडे, रवि हिराणी, अल्केश कदम, संजीव कदम, दिलीप बेदी, भारत माझिरे, विशाल पवार, सर्व संघ मालक, कमिटी मेंबर्स असे अनेकांनी सहकार्य केले आहे. क्रिकेटवर मनापासून प्रेम करणारे आमचे दाने मित्र कै. सुदीप जयस्वाल आणि कै. सुहेल डिंगणकर यांची याप्रसंगी आठवण आल्याशिवाय राहत नाही. या सर्वांचेच सहकार्य जगदाळेंना लाभले आणि जगदाळेंनी खऱ्या अर्थाने वकिलांच्या क्रिकेटला मोठे केले आहे.