फोकस

आर्यन खानचा जामीन कोर्टाने फेटाळला

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात २ ऑक्टोबरला एनसीबीकडून अटक करण्यात आलेली असून तो सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. कोर्टानं आर्यनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. आज आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी एनडीपीएस कोर्टात आज पार पडली. मात्र, आर्यन खानला कोर्टाने दणका देत जामीन फेटाळून लावला आहे.

एनसीबीची कोठडी संपल्यानंतर आर्यन खानला इतर आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार तुरुंग प्रशासनानं आर्यन खानची सुरक्षा आता वाढवली आहे. आर्यनला स्वतंत्र आणि स्पेशल बॅरेकमध्ये हलविण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तुरुंग प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून वैयक्तिक पातळीवर आर्यन खानवर लक्ष ठेवलं जात आहे. आर्यन खान आणि एका अभिनेत्रीमध्ये चॅटिंग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोर्टामध्ये युक्तिवादादरम्यान, एनसीबीच्या पथकाने आरोपींचे जे चॅट कोर्टासमोर ठेवले आहेत. त्यामध्ये आर्यन खान आणि या अभिनेत्रीमध्ये झालेल्या चॅटचाही समावेश आहे. याशिवाय आर्यन खानचे काही ड्रग्स पेडलरसोबतचे चॅटही कोर्टात सोपवण्यात आले आहेत. एनसीबीने आर्यन खानला जामीन देण्यात येऊ नये यासाठी एनसीबीने आपले म्हणणे मांडले होते. कोर्टामध्ये त्यावरून दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला. आर्यन खानचे इंटरनॅशनल ड्रग्स पेडलर्ससोबत संबंध असल्याचा दावा एनसीबीने कोर्टात केला. तसेच हा मोठा कट असून, ज्याचा तपास होण्याची आवश्यकता आहे, असे एनसीबीने म्हटले आहे.

आर्यनची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी उद्या संपणार आहे. त्यामुळे उद्या आर्यनचा जेलचा मुक्काम आणखी किती दिवस वाढणार हे कोर्ट ठरवणार आहे. तर एनडीपीएस कोर्टाने आज जामीन फेटाळल्यानंतर आर्यनचे वकील मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button