राजकारण

अनिल देशमुख सीबीआयच्या ताब्यात!

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांची पुन्हा चौकशी सुरू होणार आहे. अनिल देशमुखांना नागपूर येथील घरातून ताब्यात घेण्यात आल्याचे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.

सीबीआयने १०० कोटींची खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात देशमुखांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यानंतर नागपूर तसंच मुंबईतील त्यांच्या घरांवर छापेमारी करण्यात आली. यावेळी नागपूरमधून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी अनिल देशमुख यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे ५ जण अनोळखी असल्याचे एफआयआरमध्ये नमुद करण्यात आले आहे. दरम्यान आरोपी या रकान्यात अनिल देशमुखांचेही नाव आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील ही अत्यंत मोठी घडामोड आहे.

प्राथमिक चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले होते. त्यानंतर सीबीआयने ही कारवाई केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाप्रकरणी सीबीआयने महाराष्ट्रचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. प्रकरणी सीबीआयने मुंबई-नागपूरसह विविध भागात छापेमारी केल्यानंतर अनिल देशमुखांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button