फोकस

अनन्या पांडेची एनसीबीकडून सव्वा दोन तास चौकशी

मुंबई : सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान क्रूजवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्थर रोड तुरुंगात आहे. आर्यनच्या अटकेने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली असताना आता अभिनेता चंकी पांडेची मुलगी व अभिनेत्री अनन्या पांडे एनसीबीच्या रडारवर आली. आज एनसीबीने समन्स बजावल्यानंतर अनन्या वडील चंकी पांडे यांच्यासोबत एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाली आणि चौकशीला सामोरी गेली आहे. त्यानंतर सायंकाळी ६.१५ च्या सुमारास अनन्या एनसीबी कार्यालयातून बाहेर पडली. अनन्याची जवळपास सव्वा दोन तास चौकशी पार पडली.

अनन्या पांडेची चौकशी केल्यानंतर तिला उद्या पुन्हा येण्यास सांगण्यात आलं आहे. खरं तर अनन्या पांडे हिला एनसीबीने आज दुपारी २ वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. सुमारे सव्वा दोन तासाच्या चौकशीनंतर अभिनेत्री अन्यन्या पांडे आणि वडील चंकी पांडे एनसीबी कार्यालयाच्या बाहेर पडले.

ज्या दिवशी आर्यनला क्रूजवरून एनसीबीने ताब्यात घेतलं. त्यादिवशी अनन्या पांडे ही सुद्धा क्रूझवरच्या त्या पार्टीत हजर होती. मात्र कथितरित्या एनसीबीने तिला जाऊ दिले होते. पण आर्यनच्या चॅटमध्ये अनन्या पांडेचं नाव आल्यानं एनसीबी अ‍ॅक्शनमोडमध्ये आली आहे. अनन्या ही आर्यनची चांगली मैत्रिण आहे. आर्यनची बहीण सुहाना खान ही सुद्धा अनन्याची बेस्ट फ्रेंड आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button