फोकसमनोरंजन

अनन्या पांडेची एनसीबीकडून सलग ४ तास कसून चौकशी

मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडेची चौकशी संपली आहे. ती एनसीबीच्या कार्यालयातून संध्याकाळी ६.१५ च्या दरम्यान बाहेर पडली. यावेळी तिच्यासोबत वडील चंकी पांडेदेखील होते. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे तसेच अन्य एका महिला अधिकाऱ्याने अनन्याची चौकशी केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी ही चौकशी करण्यात आली असून तिला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानशी ड्रग्ज संदर्भात झालेल्या चॅटिंगविषयी प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती मिळतेय. क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टीत अडकलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्याशी अनन्या पांडेचा ड्रग्जसंदर्भात चॅटिंच्या माध्यमातून संवाद झाल्याचा संशय एनसीबीला आहे. एनसीबीतर्फे अनन्याची साधारण चार तास चौकशी करण्यात आली.

अनन्या पांडेची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली आहे. साधारण अडीच वाजता तिची चौकशी सुरु करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार आर्यन खान तसेच अनन्या पांडे याच्यात गांजाची तजविज करण्यासंदर्भात व्हॉट्सअ‍ॅपवर संभाषण झाले होते. तशी माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींवर स्पष्टीकरण देण्यासाठी तिला एनसीबी कार्यालयात बोलावण्यात आले होते. साधारणत: साडे तीन ते चार तास ही चौकशी चालली. या चौकशीत एनसीबीने अनन्याला नेमके कोणते प्रश्न विचारले, हे अद्याप समजू शकलेले नाही. पण आर्यन तसेच अनन्या यांच्यात व्हॉट्सअ‌ॅपवर जो संवाद झाला त्याविषयीच विचारणा झाल्याच अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

गुरुवारी एनसीबीने आर्यन खान ड्रग्स प्रकरणाबाबत अनन्या पांडेची २ तास चौकशी केली. आर्यन खान आणि अनन्या पांडेच्या गप्पांमध्ये आर्यन अनन्याशी एका ठिकाणी गांजाबद्दल बोलत होता. आर्यन विचारत होता की, काही जुगाड होऊ शकते का? यावर अनन्याने उत्तर दिले आणि सांगितले की, मी व्यवस्था करीन. याच संवादावर अनन्याने गुरुवारी स्पष्टीकरण दिले. अनन्याने एनसीबीला सांगितसे की ती फक्त विनोद करत होती. आर्यनशी तिच्या गप्पा ड्रग्सबद्दल नाही तर सिगारेटबद्दलच्या आहेत. दोघांमध्ये सिगारेटबद्दल संभाषण झाले होते. मी कधीही ड्रग्जचे सेवन केले नाही, असे अनन्याने गुरुवारी एनसीबीला सांगितले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button