Top Newsराजकारण

आदित्य ठाकरेंमुळे मुख्यमंत्र्यांचा ताण कमी झाला, पण जनतेचा वाढला ! अतुल भातखळकरांची टीका

मुंबई : आदित्य ठाकरे यांच्यामुळे उपनगरातील लोकांचं टेन्शन वाढलं आहे. तौत्के, निसर्ग चक्रीवादळ आलं, लोकांच्या घरात पाणी शिरलं तरी आदित्य ठाकरे एकदाही फिरकले नाहीत. एक मात्र नक्की की तुमच्या पावलावर पाऊल ठेवत ते देखील मंत्रालयात पाऊल ठेवत नाहीत. जनप्रतिनिधी हे तुमचं टेन्शन कमी करण्यासाठी नाहीत, तर जनतेचं टेन्शन कमी करण्यासाठी असतात. त्यामुळे तुमचं टेन्शन कमी झालं असलं तरी जनतेचं टेन्शन वाढलंय हे नक्की, अशा शब्दात भाजप नेते आ. आतून भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर टोलेबाजी केलीय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पाठीच्या मणक्याबाबत नुकतीच मोठी शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर राज्यातील अनेक महत्वाच्या बैठका आणि हिवाळी अधिवेशनातही सहभागी होऊ शकले नाही. त्यानंतर १ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांनी नगरविकास खात्याच्या बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला आणि मालमत्ता करमाफीबाबत महत्वाची घोषणा केली. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी आपले चिरंजिव आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं कौतुक केलं. आदित्य ठाकरे यांनी आपला ताण कमी केल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना जोरदार टोला लगावला. या महापालिका निवडणुकीत कुणाकडेही नेतृत्व द्या, जिंकणार तर भाजपचं, असा दावाही भातखळकर यांनी केलाय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button