राजकारण

चंद्रकांतदादांना स्वप्नातही अजित पवार दिसतात : आ. मिटकरी

मुंबई: औरंगजेबाला ज्याप्रमाणे स्वप्नात शिवाजी महाराज दिसायचे. त्याप्रमाणेच चंद्रकांत पाटील यांना स्वप्नात केवळ अजित पवारच दिसतात, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केले.

चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. पाण्याविना मासे तडफडतात तशी राज्यातील भाजप नेत्यांची अवस्था आहे. मात्र, त्यांनी उगाच सत्तेची स्वप्न पाहू नयेत. राज्यात पुढील १५ वर्षे महाविकास आघाडीची सत्ता असेल, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला. आता या टीकेला भाजपकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले होते. सरकार जाणार, हे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी जागे असताना की झोपेत केलं होतं, असा प्रश्न अजितदादांनी विचारला. यावर चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना चांगलेच सुनावले आहे. त्यामुळे सध्या अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button