ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने २२ हून अधिक रुग्णांचा तडफडून मृत्यू
तिरुपती येथील धक्कादायक घटनेने देश पुन्हा हादरला

तिरुपती : आंध्र प्रदेशातील एका घटनेमुळे देश पुन्हा हादरला आहे. तिरुपती येथील रुईया रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने तब्बल २२ रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला आहे. ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रुईया या खासगी रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार सुरू होते. दरम्यान अचानक ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्यानेही ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
अतिदक्षता विभागात हे कोविड रुग्ण दाखल आहेत. दरम्यान ऑक्सिजन पुरवठा थांबताच राखीव ठेवण्यात आलेले ऑक्सिजन सिलेंडर लावण्याचा प्रयत्न झाला. त्या पाच मिनिटात श्वास घेता न आल्याने व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला. या घटनेचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावल फिरत आहे. दरम्यान श्रीपेरम्बदुर येथून ऑक्सिजनचा टॅकर मागवण्यात आला आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली असून तणावाचे वातावरण आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत




