इतर

आसाराम बापूची प्रकृती चिंताजनक; एम्स रुग्णालयात हलवण्याची शक्यता

जयपूर: लैंगिक अत्याचारप्रकरणात कारावासाची शिक्षा भोगत असलेला स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापूला कोरोनाची लागण झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. काही तासांपूर्वीच आसारामला महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

आसारामची प्रकृती वेगाने खालावत आहे. आसारामच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी झाली आहे. त्यामुळे त्याची प्रकृती नाजूक आहे. त्यामुळे आता आसाराम बापूला उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल केले जाण्याची शक्यता आहे. ५ मे रोजी त्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर त्याची प्रकृती बिघडत गेली.

जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात गेल्या महिन्यात कोरोनाचा विस्फोट झाला होता. या ठिकाणी जवळपास एक डझन कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर या सर्व कोरोना पॉझिटिव्ह कैद्यांना तुरुंगातील दवाखान्यात विलगीकरणात ठेवण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button