अर्थ-उद्योगआरोग्य

गोदरेजकडून खंडाळा सार्वजनिक आरोग्य केंद्रांना कोविड लसी ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटर्सची भेट

पुणे : गोदरेज समुहातील प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयसने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या, भारतातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक गोदरेज अप्लायन्सेस या गोदरेज बॉयसच्या बिझनेस युनिटने प्रत्येकी २२५ लिटर क्षमतेचे ४ विशेष वॅक्सीन रेफ्रिजरेटर्स खंडाळा येथील तीन सार्वजनिक आरोग्य केंद्रे आणि एका ग्रामीण रुग्णालयाला मदत म्हणून पुरवले आहेत. या आरोग्य केंद्रांना व रुग्णालयाला कोविड लसीकरण अभियान राबवण्यासाठीची आपली तयारी अधिक मजबूत करता यावी या उद्देशाने गोदरेज अप्लायन्सेसने त्यांना ही मदत पुरवली आहे.

लसी आणि जीवनरक्षक वस्तूंसाठी भारतात बनवलेल्या, अत्याधुनिक शीत साठा सुविधांसह गोदरेज भारत सरकारच्या, सध्या सुरु असलेल्या कोविड लसीकरण अभियानामध्ये सहयोग देत आहे. एका औपचारिक समारंभामध्ये हे चार वॅक्सीन रेफ्रिजरेटर्स सार्वजनिक आरोग्यकेंद्रांना नुकतेच सुपूर्द करण्यात आले. खंडाळ्याचे माननीय तहसीलदार दशरथ काळे यांनी यावेळी उपस्थित राहून ही युनिट्स खंडाळ्याच्या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील यांना सुपूर्द केली. यावेळी गोदरेजच्या इतर प्रतिनिधींबरोबरीनेच गोदरेज अप्लायन्सेसच्या शिरवळ प्लांटचे प्रमुख सुनील बेलोसे हे देखील उपस्थित होते.

गोदरेज अँड बॉयसच्या कोविड आउटरीच उपक्रमातर्गत कंपनीने हे पाऊल उचलले आहे. गोदरेज अप्लायन्सेस, गोदरेज लॉकीम मोटर्स आणि गोदरेज इंटेरिओ हे वेगवेगळे विभाग यामध्ये सहभागी आहेत. विविध उद्योगक्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या कंपन्यांचा समावेश असलेल्या गोदरेज समूहातील प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयस ही राष्ट्र निर्माण आणि समाजहिताच्या जबाबदारीबद्दलच्या वचनबद्धतेसाठी नावाजली जाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button