आरोग्य

धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. मुंडे यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली आहे. “माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी positive आली आहे.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती.मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही.सर्वांनी मास्क वापरावा,सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी”, असं ट्वीट धनंजय मुंडे यांनी बुधवारी रात्री केलंय.

यापूर्वी 12 जून 2020 रोजी धनंजय मुंडे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांना थोडं अस्वस्थ वाटू लागल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. 22 जून 2020 रोजी कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. रुग्णालयातून बाहेर पडताना धनंजय मुंडे यांनी हात उंचावून आणि हात जोडत डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button