अर्थ-उद्योगतंत्रज्ञान

टोयोटा किर्लोस्कर मोटर्सतर्फे ‘द हायलक्स’चे अनावरण

बंगलोर : एक आश्चर्यकारक लाईफस्टाईल युटीलिटी वाहन हवे असणाऱ्या ग्राहकांसाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर्स (TKM) यांनी आज त्यांची अद्वितीय टोयोटा हायलक्स बाजारात आणली आहे जी अत्यंत कठीण भूप्रदेशांमध्ये साहसी ऑफरोडिंग ड्राईव्हची मजा लुटण्यासाठीच नव्हे तर रोजच्या सिटी ड्राईव्ह साठी देखील खास बनलेली आहे. हायलक्स हे नाव ‘हाय’ आणि ‘लक्झरी’ या शब्दांपासून बनलेले असून ते गेली अनेक दशके जगातील सर्व भूप्रदेशांत अतिशय ‘दणकटपणा’ आणि ‘कणखरपणा’ यासाठी नावाजलेले आहे.

हायलक्सच्या आजच्या बाजारातील लाँचमुळे अनेक SUV चाहत्यांची भारतीय रस्त्यांवर हायलक्सचा अनुभव घेण्याची प्रतीक्षा संपली आहे. आपल्या मूळ जातकुळीशी इमान राखत नवी टोयोटा हायलक्स ही स्थानिक परिस्थिती आणि गरजा लक्षात घेऊन तयार केली गेली आहे. टोयोटा मोटर कोर्पोरेशन (TMC) चे मुख्य अभियंता योशीकी कोनीशी, टोयोटाचे प्रादेशिक मुख्य अभियंता युराचार्ट योंगसुक, टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे (TKM) व्यवस्थापकीय संचालक मसाकाझू योशीमुरा, TKMच्या विक्री आणि ग्राहक सेवा विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष तादाशी असाझुमा आणि TKMच्या धोरणात्मक व्यवसाय कक्षाचे (स्ट्रटीजिक बिझनेस युनिट) महाव्यवस्थापक वाईजलाईन सिगामनी या सर्वांच्या सन्माननीय उपस्थितीत आज एका महासोहळ्यात हे बहुप्रतीक्षित लाईफस्टाईल वाहन लाँच झाल्याची घोषणा केली गेली.

१८० पेक्षा जास्त देशांमधील लक्षावधी लोकांची मने जिंकत हायलक्सच्या जागतिक विक्रीच्या आकड्याने २० दशलक्ष युनिट्सचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. गेली पाच दशके आणि आठ पिढ्यांपासून टोयोटा हायलक्सने काळाशी सुसंगत पावले टाकत लोकांना असामान्य अनुभव दिले आणि स्वतःच्या दैनंदिन आयुष्यात, मग ते व्यावसायिक असो की वैयक्तिक, एक असामान्यपणा आणू इच्छिणाऱ्यांशी एक अतूट नाते जोडले. जागतिक दर्जाचे इंजिनियरिंग, वाढीव सुरक्षा, आधुनिक तंत्रज्ञान आणि बेस्ट-इन-क्लास सुखसोयी अशी आपल्या सेग्मेंट मधले सर्वोत्तम (फर्स्ट -इन-सेग्मेंट) वैशिष्ट्ये टोयोटा हायलक्समध्ये तुम्हाला मिळतात.

जगात सुप्रतिष्ठित अशा या वाहनाचा दमदार परफॉरमंस हा इनोव्हेटिव मल्टीपर्पज वेहिकल (IMV) प्लॅटफॉर्ममुळे आणि यातील सशक्त पॉवरट्रेन प्रणालीमुळे आहे. इनोव्हा क्रिस्टा आणि फॉरच्युनर या भारतात आणि इतर अनेक देशांमध्ये यशस्वी झालेल्या वाहनांमध्ये असलेला हा तोच यशस्वी (बॉडी-ऑन-चॅसी) प्लॅटफॉर्म आहे. आपल्या सेग्मेंट मध्ये अग्रेसर असलेल्या ह्या मोडेल्सना ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद सतत मिळतोय, कारण यांमध्ये सशक्त इंजिनसोबतच अनेक कमालीची वैशिष्ट्ये आहेत; याशिवाय ड्रायव्हिंग कंडीशन्स कशाही असल्या तरीही विश्वास संपादन करत आहेत, कमालीची सहनशक्ती, कमी मेंटेनन्स खर्च, आणि वेगवेगळ्या कार्यांसाठी ही वाहने अतिशय व्यवहार्य ठरली आहेत.

हायलक्स मध्ये वैशिष्ट्यांचे भांडार आहे, जसे हेवी-ड्युटी टर्बो इंजिन आणि सर्वोत्तम घर्षण कार्यक्षमतेसाठी पिस्टन रिंग्स वर हिऱ्या सारखे डायमंड कोटिंग. यामुळे आतापर्यंत या सेग्मेंटमध्ये सर्वोत्तम असलेले ५०० Nm इतके अविश्वसनीय टॉर्क ग्राहकांना मिळते. थोडक्यात, हायलक्स हे परफॉरमंस, पॉवर आणि इंधनाची कार्यक्षमता असेलेले आपल्या क्लास मधले अद्वितीय वाहन आहे. पॉवर स्टेरिंगला दिल्या गेलेल्या व्हेरीएबल फ्लो कंट्रोलमुळे वाहनाची चालनसहजता कमालीची वाढली असून यामुळे शहरातील ट्राफिक मध्ये कमी स्पीडला स्टेरिंग हलके होते, आणि हायवे वर जास्त स्पीडला जड होते. ड्राईव्ह मोडशी स्टेरिंग प्रणाली अत्यंत चातुर्याने जुळवून घेत – ईको वरून पॉवर किंवा पॉवर वरून ईको मोड वर सहज स्वीच होते. बाहेर पडल्यावरचा एक कणखर साथीदार या आपल्याला लौकिकाला अगदी सार्थ ठरवत, हायलक्स आपल्याला देते एक भले मोठे फ्लॅटबेड डेक जे तुमच्या आउटडोअर गियर पासून स्पोर्ट्स इक्विपमेंट पर्यंत काहीही नेण्यास कमालीचे सक्षम आहे.

IMV फ्रेम बांधणीमुळे हायलक्सने आपल्या ऑफ-रोड क्षमतांच्या संदर्भात नवे उच्चांक गाठले आहेत. यात ७०० मिमि पर्यंतचे पाणी कपात जाण्याची अद्वितीय क्षमता आहे जी भारतातील कठीण रस्त्यांसाठी निर्माण केली गेली आहे. चाकांवारचे कमालीचे नियंत्रण आणि इलेक्ट्रोनिक डिफ-लॉक वैशिष्ट्यामुळे देखील अत्यंत कठीण रस्त्यांवर वाढीव इंधन कार्यक्षमता राखत हायलक्सला लाभली आहे आश्चर्यकारक ऑफ-रोड क्षमता. खऱ्या अर्थाने या वाहनाची बांधणी टोयोटाच्या ‘ग्राहक सर्वप्रथम’ या ब्रीदावर आधारित आहे – ज्यामुळे ग्राहकांच्या अपेक्षा आणि आकांक्षा समजून घेतल्या जातात, अनेक प्रकारच्या स्थानिक रस्त्यांवर यांचे टेस्टिंग आणि ड्राईव्हिंग केले जाते, ज्यायोगे यातील बहुकार्यक्षम सोयींचा अनुभव घेता येतो. नक्कीच हे बहुचर्चित कणखरपणा, मनोरंजक जीवनशैली, कार्यक्षमता, प्रतिसाद क्षमता आणि सुरक्षेचा एक सुरेख मिलाफ आहे.

हायलक्सच्या लांबी आणि उंचीमुळे तिचे अस्तित्व उठून दिसते. इंजिन हूड, पुढील बम्पर, लोअर गार्ड, आणि बम्परच्या कडा यांचा संगम होऊन या वाहनातील बोल्ड आणि अद्ययावत सशक्त क्रोम फ्रेमसह ट्रपीझॉयडल पियानो ब्लॅक रंगाचे ग्रिल अधोरेखित होते. यातील वैशिष्ट्यपूर्ण एलईडी रियर कॉम्बी लॅम्प्स मुळे याचे अस्तित्व अधोरेखित होते आणि रात्रीचे दिसण्याची क्षमता वाढते. ह्या वैशिष्ट्यात आणखी भर पडते ती १८ इंची अॅलॉय व्हील्समुळे.

हायलक्स सोबत तुम्हाला खरोखरंच एक अत्यंत अद्ययावत अनुभव मिळतो कारण यात कार्यक्षमतेला ग्लॅमरस इंटीरीयर्सची जोड दिलेली आहे ज्यामध्ये अत्याधुनिकता आणि सृजनशीलतेसह व्यवहार्यता, स्टाईल आणि डीझाईन यांचा मिलाफ आहे. यातील लेदर सीट्स आणि धातूचे कोंदण असलेले सॉफ्ट टच इंटीरियर यांमुळे याला एक आधुनिक आणि पुरोगामी लुक लाभला आहे. ड्राईविंगचे कम्फर्ट वाढविण्यासाठी या वाहनात शहरातील कठीण पार्किंग परिस्थितीत सोयीस्कर होण्यासाठी फ्रंट पार्किंग सेन्सर्स दिलेले आहेत. अ‍ॅन्ड्रॉईड ऑटो /अ‍ॅपल कार-प्ले सह टॅबलेट स्टाईलच्या ८ इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट प्रणालीमुळे तुमचे नेहमीच संपूर्ण नियंत्रण राहते आणि तुम्ही सतत कनेक्टेड राहता.

टोयोटा तुमच्या सुरक्षेला सर्वोपरी महत्व देते, त्यामुळे चालक आणि प्रवासी यांच्या सुरक्षेसाठी, टोयोटा हायलक्सच्या सर्वच व्हेरीयंट्स मध्ये अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये दिली गेली आहेत. ABS, EBD, ब्रेक असिस्ट सिस्टीम आणि हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल यांमुळे रस्ता कसाही असो, तुमचे ड्रायव्हिंग सुरक्षित असते, ज्यामुळे ही गाडी सर्वांना हवीहवीशी आहे. या वाहनाच्या सर्वच व्हेरीयंट्स मध्ये रिव्हर्स कॅमेरा, क्लीयरन्स सोनार आणि बॅक-अप सोनार दिलेले आहे; याशिवाय ७ SRS एयर बॅग्स, डाऊनहिल असिस्ट कंट्रोल आणि वेहिकल स्टॅबिलीटी कंट्रोल अशा सोयींमुळे ग्राहकाला सर्वात सुरक्षित टोयोटा हायलक्स चालविल्याचा थरार आणि आनंद मिळतो.

या गाडीत दिल्या गेलेल्या अत्युच्च दर्जाच्या सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे टोयोटा हायलक्स या गाडीला दक्षिण पूर्व आशियाई देशांसाठी असलेल्या न्यु कार असेसमेंट प्रोग्राम (ASEAN NCAP) कडून 5-स्टार क्रॅश सेफ्टी रेटिंग प्राप्त झाले आहे.

याशिवाय, सौदी अरेबिया येथे नुकत्याच पार पडलेल्या आणि जगात सर्वात अवघड अशी रॅली मानल्या गेलेल्या ४४ व्या डकार रॅली २०२२ मध्ये टोयोटा गाझू रेसिंग टीमने विकसित केलेल्या नव्या GR DKR हायलक्स T1+ ने असामान्य विजय प्राप्त केला. टोयोटा GR हायलक्स या गाडीच्या नेत्रदीपक विजयामुळे अभियांत्रिकीच्या कक्षा सतत रुंदावत ठेवण्याची आणि सतत चांगल्या कार्स बनविण्याची टोयोटाची क्षमता अधोरेखित झाली आहे.

टोयोटा हायलक्सच्या डिझाईन संकल्पानेबद्द्दल बोलताना टोयोटाचे प्रादेशिक मुख्य अभियंता श्री. युराचार्ट योन्गुसुक म्हणाले, “आणखी चांगल्यात चांगल्या गाड्या बनविण्याच्या आमच्या प्रयत्नात असतांना, आम्ही ग्राहकांना उद्युक्त करणाऱ्या गरजांचा आणि स्थानिक परिस्थितीत वाहनांचा वैविध्यपूर्ण वापर यांचा बाजाराबद्दल जास्तीत जास्त अंतर्दृष्टीच्या सहाय्याने सखोल अभ्यास करतो. एक श्रीमंत प्रवासी अनुभव घेण्याच्या त्यांच्या आंतरिक इच्छा आणि आकांक्षांचा विचार करता, अतिशय कणखर आणि अजिंक्य अशी सशक्त IMV वंशावळीतली हायलक्स भारतीय बाजारात आणताना आनंद होत आहे.

प्रचंड शक्तीमान आणि बराच काळ चालण्यासाठी बनवलेली हायलक्स ही टोयोटाच्या जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकीचे, वर्धित सुरक्षा प्रणालीचे आणि बेस्ट-इन-क्लास कम्फर्टचे द्योतक आहे, जी ‘कुठेही जाणारी’, ‘काहीही करू शकणारी’ गाडी म्हणून अशा ग्राहकांसाठी सुयोजित आहे ज्यांना साहस, थरार आणि समृद्ध करणारे क्षण आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत अनुभवायचे आहेत.”

टोयोटा हायलक्सचे बाजारात अवतरण करताना TKMचे व्यवस्थापकीय संचालक मसाकाझू योशीमुरा म्हणाले, “या अवतरणामागे ग्राहकांच्या संख्याशास्त्रीय दृष्टीकोनातल्या सतत विकसित होत राहणाऱ्या अपेक्षांना नवनवीन उत्पादने देऊन पूर्ण करणारे ‘ग्राहक सर्वप्रथम’ हे तत्वज्ञान आहे. आज, जेव्हा भारत मोठमोठ्या आर्थिक झेपा घेत आहे, अनेक ग्राहकांना हवे आहे एक अद्ययावत लाइफस्टाइल वाहन ज्यात त्यांना मिळेल अद्वितीय ऑन-आणि-ऑफ रोड क्षमता, आणि शिवाय त्यांच्या दैनंदिन शहरी गतिशीलतेच्या गरजाही भागतील, मग त्या कामाशी निगडीत असोत किंवा मनोरंजनाशी.

हायलक्स ग्राहकांच्या या सर्व मागण्या पूर्ण करेल आणि आशा आहे की ती देशात स्वतःच्या नव्या जातकुळीची सुरुवात करेल. याशिवाय, बाजारातील या अवतरणामुळे आमच्यासाठी भारतात एक मार्ग सुनिश्चित होत आहे ज्यायोगे आम्ही अनेक नवनवीन ग्राहकांचे टोयोटा कुटुंबात स्वागत करू शकू आणि ‘ज्यामुळे ‘सर्वांसाठी सार्वत्रिक आनंद’ हा आमचा हेतू साध्य होऊ शकेल. २०२२ ह्या वर्षाची सुरुवात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या ऐतिहासिक क्षणांनी करत असताना येणाऱ्या काळात आमचा आणखी आश्चर्यकारक उत्पादने घेऊन येण्याचा मानस आहे.”

TKMच्या विक्री आणि ग्राहक सेवा विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष श्री. तादाशी असाझुमा आपले विचार मांडताना म्हणाले, “ हायलक्स च्या ह्या बाजारातील अवतरणामुळे ‘अद्वितीय कणखरता आणि अद्ययावतता’ हा केंद्रबिंदु अधोरेखित झाला आहे. इनोव्हा क्रिस्टा आणि फॉरच्युनर या यशस्वी मॉडेल्सच्या माध्यमातून ग्राहकांच्या भेटीला आलेले गुणवत्ता, टिकाऊपणा आणि विश्वसनीयता ह्या गुणांचा ग्राहकांना पुन्हा आनंद घेता येणार आहे. आमच्याशी ईमान राखणाऱ्या अनेक ग्राहकांसाठी हे नवे उत्पादन म्हणजे टोयोटासोबत त्यांच्या प्रवासातील पुढचे पाऊल ठरणार आहे. आमची इच्छा आमच्या ग्राहकांना आयुष्यभर पुरातील अशा अनुभवांनी रोमांचित करत राहण्याची आहे ज्यायोगे त्यांच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण होतील आणि त्यांच्या हाताशी अनेक पर्याय उपलब्ध असतील.

हायलक्स अशा लोकांच्या आयुष्यातून प्रेरणा घेते जे कधीही माघार घेत नाहीत आणि त्यामुळे ह्यात सर्व गोष्टींमधील सर्वोत्तम तेच दिलेले आहे. याशिवाय, हायलक्सच्या रोमांचकारी अनुभवला पूरक ठरतील आणि आमच्या साहसी ग्राहकांना आवडतील अशी विशेष अॅक्सेसरीजची नवी मालिका बाजारात आणल्याची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ह्या उत्पादनांमध्ये हायलक्सची डिझाईन संकल्पना पुरेपूर प्रतिबिंबित झाली आहे. हायलक्सचे अष्टपैलुत्व आम्ही सुचविलेल्या या अ‍ॅक्सेसरीजमुळे आणखी शतगुणित होईल. अशा अ‍ॅक्सेसरीज बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही ग्राहकांना आग्रह करतो की त्यांनी आपल्या जवळच्या टोयोटा टचपॉइंट्सना भेट द्यावी.

बाजारातील या अवतरणाच्या अनुषंगाने यापूर्वीपासूनच आमच्या सध्याच्या आणि नव्या ग्राहकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि आम्हाला खात्री आहे की हा प्रतिसाद यापुढे कळस गाठेल.”

टोयोटा हायलक्स साठी बुकिंग्स आता खुली आहेत. एप्रिल २०२२ मध्ये डिलिव्हरीज सुरु करण्यापूर्वी मार्च २०२२ मध्ये एक्स-शोरूम किमतींची घोषणा करण्यात येईल. ग्राहकांना ही कार ऑनलाईन (www.toyotabharat.com) बुक करता येईल किंवा नजीकच्या टोयोटा डीलरकडेही बुक करता येईल.

टोयोटाच्या व्हर्च्युअल शोरूम मध्ये ग्राहकांना त्यांच्या घरातूनच आरामात हायलक्सचा अनुभव घेता येईल. खरोखरच ‘तुम्ही जिथे आहात तिथे आम्हीही तुमच्या सोबत आहोत’ याचेच हे प्रतिबिंब आहे. आता ग्राहकांना अतिशय सुलभतेने गाडीच्या आतील आणि बाहेरील व्ह्यूज ३६० अंशांच्या कोनातून पाहता येणार आहेत, सर्व उपलब्ध रंग आणि व्हेरीयंट्स पाहता येणार आहेत, सर्व महत्वाची फीचर्स अनुभवता येणार आहेत आणि प्रत्येक व्हेरीयंट-गणिक तुलना करता येणार आहे. ह्यामध्ये ग्राहकांना एका क्लिकच्या सहाय्याने गाडी ई-बुक करता येणार आहे.

टोयोटा हायलक्सची ठळक वैशिष्ट्ये

– या नवीनतम लाईफस्टाईल वाहनात आहे २.८ लिटरचे फोर-सिलिंडर टर्बो-डीझेल इंजिन आणि हे ६-स्पीड ऑटोमॅटिक आणि ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे
– यातील जागतिक दर्जाचे इंजिनियरिंग, वाढीव सुरक्षा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि या वर्गातील सर्वोत्तम (बेस्ट इन-क्लास) सुखसोयी यांमुळे तुमचा प्रत्येक दिवस देईल एक साहसी अनुभव. यातील ऑटोमॅटिक ट्रान्समिशन (AT) प्रकारात तुम्हाला मिळते या सेग्मेंट मधील सर्वोत्तम २०४ HP पॉवर आणि ५०० Nm चे टॉर्क आउटपुट, तर मॅन्युअल ट्रान्समिशन (MT) प्रकारात मिळते २०४ HP पॉवर आणि ४२० Nm चे टॉर्क आउटपुट. सर्व प्रकारांमध्ये (व्हेरीयंट) ग्राहकांना अत्यंत सहज ऑफ-रोडिंग साठी ४x४ ड्राईव्हट्रेन उपलब्ध आहे.
– आपल्या कणखरपणासाठी सुप्रसिद्ध असलेल्या या लाईफस्टाईल वाहनात आहे मजबूत बॉनेट लाईन आणि सशक्त क्रोम फ्रेमसह पियानो ब्लॅक ट्रपीझॉयडल ग्रिल ज्यांच्या सहाय्याने दिला गेलाय एक बोल्ड लुक आणि अद्ययावत फील. याशिवाय या वाहनात आहेत सुपर क्रोम फिनिशसह आश्चर्यकारक १८-इंची अॅलॉय व्हील्स.
– शार्प-स्वेप्ट बॅक एलईडी हेडलाईट्स आणि सुप्रसिद्ध नाईट-टाईम सिग्नेचरसह एलईडी रियर कॉम्बी लॅम्पस यांमुळे या लाईफस्टाईल वाहनाचा मॉडर्न लुक परिपूर्ण होतो.
– विपरीत हवामान आणि आव्हानात्मक रस्त्यांवर वाहनावर संपूर्ण ताबा राखता येण्यासाठी यात आहेत सर्वोत्तम सुरक्षा फीचर्स जसे – ७ SRS एयरबॅग्स, वेहिकल स्टेबिलीटी कंट्रोल (VSC), ट्रॅक्शन कंट्रोल (TC) आणि इलेक्ट्रॉनिक प्रणाली
– कोणत्याही परिस्थितीत चालकाकडे पूर्ण ताबा राखण्यासाठी यात आहेत इलेक्ट्रनिक डिफरन्शियल लॉक (EDL), ऑटोमॅटिक हिल असिस्ट कंट्रोल (HAC), डाऊनहिल असिस्ट कंट्रोल (DAC) आणि ऑटोमॅटिक लिमिटेड स्लिप डिफरन्शियल (ALSD)
– वाहनाच्या स्पीडला शोभणारी नैसर्गिक हाताळणी देण्यासाठी VFC स्टेरिंग
– अत्यंत आरामदायक ड्राईव्हसाठी यात आहेत सेग्मेंट मधील सर्वोत्तम (फर्स्ट-इन-सेग्मेंट) सुविधा जसे ड्राईव्ह मोड्स ऑप्शन्स (पॉवर आणि ईको), टायर अँगल मॉनीटर आणि फ्रंट पार्किंग सेन्सर्स
– वाहनात प्रवाशांच्या सर्वोच्च आरामासाठी लेदर सीट्स, ड्यूएल झोन संपूर्ण ऑटोमॅटिक तापमान नियंत्रण प्रणाली, स्मार्ट एन्ट्री आणि ऑटो हेड लँम्प्स
– यात आहेत मनोरंजन आणि सीमलेस कनेक्टीविटी तंत्रज्ञान देणारा अॅन्ड्रॉईड ऑटो /अॅपल कार-प्ले सह आठ इंची इन्फोटेनमेंट टेबल स्टाईल स्क्रीन
– टोयोटा हायलक्स या मनमोहक रंगांमध्ये उपलब्ध आहे – इमोशनल रेड, व्हाईट पर्ल, सिल्व्हर मेटॅलिक, सुपर व्हाईट आणि ग्रे मेटॅलिक
– हायलक्स मध्ये आहे प्रशस्त डेक ज्यामध्ये तुम्हाला मिळते अद्वितीय जागा आणि कमालीची लवचिकता

अंतर्गत सोयी:

– नवीन आठ-इंची स्मार्ट प्लेकास्ट टचस्क्रीन ऑडियो (अॅन्ड्रॉईड ऑटो /अॅपल कार-प्ले सह) आणि स्मार्ट-फोन आधारित नॅव्हीगेशन
– सर्वोत्तम दर्जाची लेदर सीट्स (फक्त AT प्रकारात उपलब्ध)
– स्टोरेजसह फ्रंट सेंटर स्लायडिंग आर्मरेस्ट
– लेदर आच्छादित स्टेरिंग व्हील
– अपर कुल्ड ग्लव बॉक्स

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button