राजकारण

आपला महापौर बसवण्यासाठी एकेका नगरसेवकाला ३५-३५ लाख दिले; विनय कोरे यांची कबुली

कोल्हापूर : कोल्हापुरात आपल्या पक्षाचा महापौर करण्यासाठी एकेका नगरसेवकाला चक्क ३५-३५ लाख रुपये दिले. त्यामुळे, लोकांचा माझ्याबद्दल पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. भावनेच्या भरात माझ्याकडून झालेली ही सर्वात मोठी चूक होती, अशी धक्कादायक कबुली जनसुराज्य पक्षाचे प्रमुख आणि माजी मंत्री विनय कोरे यांनी दिली आहे. जनसामान्यांच्या मनात राजकारणाबद्दल तिरस्कार होईल, असे राजकारण बंद केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.

आमदार विनय कोरे आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी साधारण १५ वर्षापूर्वी महापालिकेतील माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले होते. त्यावेळी, नगरसेवकांना आपल्याकडे खेचून महाडिकांची महापालिकेतील सत्ता संपुष्टात आणली होती. काही वर्षांपूर्वी कोल्हापुरात महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील एकत्र होते. तर, मी आणि हसन मुश्रीफ एकत्र होतो. त्यावेळी कोल्हापुरात महापौर करण्यासाठी एकेका नगरसेवकाला ३५-३५ लाख दिले होते. माझ्या पक्षाचा महापौर झाला. मात्र, लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. भावनेच्या भरात मी केलेली ही सर्वात मोठी चूक होती, अशी कबुलीच कोरे यांनी पत्रकारांसमोर दिली.

कोल्हापूरातील वडगाव बाजार समिती निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू असून बड्या नेत्यांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button