अदर पुनावालांनी पुण्यात कमर्शियल टॉवरमध्ये खरेदी केले १३ मजले !

पुणे : लस निर्मित्ती क्षेत्रातील नामवंत उद्योजक आणि कोविशिल्ड लसीचे प्रणेते सीरम इन्स्टिटयूटचे सर्वेसर्वा अदर पुनावाला यांनी पुण्यात ऑफिससाठी मोठी जागा खेरदी केली आहे. सायरस पुनावाला यांच्या पुनावाला फायनान्स या कंपनीने पुण्यातील एका कमर्शिलय टॉवरमध्ये १३ माजले विकत घेतले आहेत. पुण्यातील मुंढवा परिसरात हे टॉवर असून या खरेदी केलेल्या एकूण मजल्यांची किंमत बाजार मुल्यांकनानुसार ४६४ कोटी रुपये असल्याचे समजते.
पुण्यात कंपनीच्या ऑफिससाठी विकत घेण्यात आलेली ही अलिकडच्या काळातील सर्वात मोठी प्रॉपर्टी असल्याचं जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. नव्या प्रॉपर्टीसह पुनावाला फायनान्सकडे एपी ८१ टॉवरचा संपूर्ण विंग आहे. कारण, कंपनीने यापूर्वीच टॉवरमधील या विंगचा पहिला आणि दुसरा असे दोन फ्लोअर विकत घेतले आहेत. कोरोना महामारीच्या काळात देशातील पहिली लस बनविल्याने पुनावाला आणि सीरम इन्स्टिटयूट हे नाव जभभरात पोहोचले आहे. भारतातही गावखेड्यापर्यंत कोविशिल्ड पोहोचल्याने पुनावाल यांची ओळख निर्माण झाली आहे.




