यूजीसी नेट २०२१ परीक्षेच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली : नॅनल टेस्टिंग एजन्सीकडून यूजीसी नेट परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहे. डिसेंबर २०२० सत्रातील परीक्षा आणि जून २०२१ सत्रातील परीक्षा एकत्र करण्यात आल्या असून नेट परीक्षा ६ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर रोजी होणार आहेत. कोरोनामुळे डिसेंबर २०२० सत्रातील परीक्षा आणि जून २०२१ च्या परीक्षेचे अर्ज करण्यात उशिर झाला. त्यामुळे दोन्ही सत्रांच्या परीक्षा एकत्र घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या यूजीसी नेट परीक्षांचे अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली असून इच्छुक उमेदवार ugcnet.nta.nic किंवा nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. ५ सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. तर ६ सप्टेंबर २०२१ पर्यंत फी भरता येणार आहे.
याआधी डिसेंबर २०२० सत्राची यूजीसी नेट परीक्षा ही २ मे २०२१ ते १७ मे २०२१ रोजी होणार होती. मात्र कोरोना महामारीमुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आली. यूजीसी नेट डिसेंबर २०२०च्या परीक्षेची अर्ज प्रक्रिया फेब्रुवारी – मार्च २०२१ पर्यंत सुरू होती. ज्यांनी यूजीसी नेट डिसेंबर २०२० परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केले मात्र ते अर्ज सबमिट करू शकले नाहीत ते देखील आता https:\\ugcnet.nta.nic.in किंवा www.nta.ac.in वर जाऊन अर्ज पूर्ण करू शकतात.
६ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबरला होणारी यूजीसी नेट परीक्षा दोन शिफ्टमध्ये आयोजित करण्यात आली आहे. पहिली शिफ्ट सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत असेल तर दुसरी शिफ्ट दुपारी ३ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत असेल. परीक्षेचे आयोजन कॉम्प्युटरवर सीबीटी मोडमध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षेत दोन पेपर असून त्यात बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येणार आहेत. दोन्ही पेपरमध्ये १५० पश्न विचारण्यात येतील.
अर्ज प्रक्रिया : १० ऑगस्ट २०२१ ते ५ ऑगस्ट
फी भरण्याची शेवटची तारीख : ६ सप्टेंबर २०२१
अर्ज दुरुस्त करण्याची तारीख : ७ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर
परीक्षेची तारीख : ६ ऑक्टोबर २०२१ ते ११ ऑक्टोबर २०२१




