आरोग्यशिक्षण

हरियाणात शाळा सुरू करणे पडले महागात; ६ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आता अनलॉकमध्ये काही ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. हरियाणामध्ये मात्र शाळा सुरू केल्यावर कोरोनाचा धोका वाढला आहे. फतेहाबादमध्ये सहा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या मुलांना सध्या घरी आयसोलेट करण्यात आलं आहे.

सरकारी शाळेतील मुलं कोरोना संक्रमित आढळून आली आहेत. विद्यार्थी कोरोना पॉ़झिटिव्ह आढळून आल्यानंतर आता पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिकाऱ्यांना पत्र पाठवून सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचं सँपल घेण्यास सांगितलं आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सर्व सरकारी आणि खासगी शाळांना विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा व्हेरिएंटबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. कोरोना लसीकरणाचा वेग वाढवला नाही तर डेल्टा व्हेरिएंट अधिक धोकादायक ठरणार असून जीवघेणा होईल असं म्हटलं आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे परिस्थिती आणखी बिघडण्यापूर्वी त्याचा प्रसार कमी करावा लागेल. डेल्टा एक धोक्याचा इशारा आहे. हा व्हायरस पसरत आहे, पण याचे अधिक धोकादायक रूप समोर येण्यापूर्वी आपल्याला समजून घ्यावा लागेल असं देखील जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. लसीकरण मोहिमेवर अधिक जोर देणं गरजेचं आहे नाहीतर हा धोका खूप वाढेल. त्यामुळेच सप्टेंबरच्या शेवटपर्यंत सर्व देशांनी आपल्या देशातील कमीतकमी १० टक्के लोकसंख्येचं लसीकरण करणं गरजेचं आहे असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button