देशात २४ तासात कोरोनाचे ३.२६ लाख नवे रुग्ण
नवी दिल्ली : देशातील कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृत्यूदरात अजूनही वाढ सुरुच आहे. गेल्या २४ तासात देशात कोरोनाच्या ३,२६,०९८ नव्या रुग्णसंख्येची भर पडली असून ३८९० रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचवेळी ३,५३,२९९ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही ताजी आकडेवारी जाहीर केली आहे.
शुक्रवारपर्यं देशात १८ कोटी ४ लाख ५७ हजार ५७९ लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. शुक्रवारी एकाच दिवसात ११ लाख ३ हजार ६२५ लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आतापर्यंत ३१.३० कोटीहून जास्त कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
राज्यातील स्थिती
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे. शुक्रवारी ५३,२४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर ३९,९२३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण ४७,०७,९८० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.६८ टक्के एवढे झाले आहे. राज्यात शुक्रवारी ६९५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५ टक्के एवढा आहे.