Uncategorized

बॉम्बे हायजवळ बार्जमधील १८४ जणांची सुटका; १४ मृतदेह हाती, अद्याप ६१ जण बेपत्ता

मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे बार्ज P-305 वरील १८४ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली. वाचवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना घेऊन आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकाता मुंबई बंदराकडे परतले आहेत. आयएनएस तेग, आयएनएस बेतवा, आयएनएस ब्यास P81आणि सी किंग हेलिकॉप्टर द्वारे बचाव कार्य अद्याप सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

‘तौक्ते चक्रीवादळाच्या’ तडाख्यात सापडलेले बार्ज हे जहाज बुडाल्याची घटना समोर आली. या वादळादरम्यान बॉम्बे हायजवळ डायमंड ऑईल फील्ड जवळील एका बार्जमध्ये २७३ कर्मचारी अडकल्याचे वृत्त समोर आले होते. ही माहिती मिळताच नौदलाने बचाव कार्य सुरू केले. दरम्यान, सुरुवातीला १४६ कर्मचाऱ्यांची नौदलाकडून सुखरुप सुटका करण्यात आली. त्यानंतर आज नौदलाकडून इतर कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत १८४ जणांची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली असून वाचवण्याच आलेल्या कर्मचाऱ्यांना घेऊन आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकाता मुंबई बंदराकडे आले आहेत. दरम्यान, आयएनएस तेग, आयएनएस बेतवा, आयएनएस ब्यास पी८१ आणि सी किंग हेलिकॉप्टरद्वारे अजूनही बचाव कार्य सुरू आहे.

चक्रीवादळादरम्यान अरबी समुद्रात बॉम्बे हाय येथे अडकलेल्या बोटींना वाचविण्यासाठी भारतीय नौदलाची मदत मागण्यात आली. त्यानंतर भारती नौदलाने आपली युद्धनौका आणि हवाई जहाज बचाव मोहिमेसाठी रवाना झाल्या. बॉम्बे हाय परिसरातील हीरा ऑईल फील्ड जवळील एका बार्ज पी३०५ मध्ये काही जण अडकल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर भारतीय नौदलाने आयएनएस कोचीच्या माध्यमातून शोध आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले. यासोबत दुसरी नौका आणि हेलिकॉप्टरची मदत घेत ऑपरेशन यशस्वी करत आतापर्यंत १८४ जणांची सुटका करण्यात आली आहे. यामुळे अनेकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button