अर्थ-उद्योगतंत्रज्ञान

हिरो मोटोकॉर्पकडून ‘डेस्टिनी १२५ ‘प्‍लॅटिनम’ सादर

Destiny 125 Platinum from Hero MotoCorp

नवी दिल्ली : गतीशील उत्‍पादन धोरण कायम राखत हिरो मोटोकॉर्प या जगातील सर्वात मोठ्या मोटरसायकल्‍स व स्‍कूटर्सच्‍या उत्‍पादक कंपनीने नवीन डेस्टिनी १२५ ‘प्‍लॅटिनम’ एडिशन सादर केली आहे. आकर्षक, प्रिमिअम व टिकाऊ डेस्टिनी १२५ प्‍लॅटिनममध्‍ये नवीन डिझाइन व थीम आहेत, जे तिच्‍या आकर्षकतेमध्‍ये अधिक भर करतात. माएस्‍ट्रो एज १२५ स्‍टील्‍थ व प्‍लेजर+ प्‍लॅटिनमच्‍या धर्तीवर डिझाइन करण्‍यात आलेली ही नवीन स्‍कूटर हिरोच्‍या स्‍कूटर पोर्टफोलिओमधील ऑफरिंग्‍जच्‍या वैविध्‍यपूर्ण श्रेणीला अधिक पुढे घेऊन जाते.

सुधारित आकर्षकता, सिग्‍नचेर एलईडी गाइड लॅम्‍प, प्रिमिअम बॅजिंग, शीट मेटल बॉडीसह नवीन ब्‍लॅक व क्रोम थीम असलेली डेस्टिनी १२५ प्‍लॅटिनम विविध ग्राहक विभागांचे लक्ष वेधून घेईल. डेस्टिनी १२५ प्‍लॅटिनम देशभरातील हिरो मोटोकॉर्प डिलरशिप्‍समध्‍ये ७२,०५०/- रूपयांच्‍या* आकर्षक किंमतीत उपलब्‍ध आहे. * (एक्‍स-शोरूम, दिल्‍ली)

हिरो मोटोकॉर्पचे धोरण व जागतिक उत्‍पादन नियोजनाचे प्रमुख मालो ली मेसन म्‍हणाले, ”डेस्टिनी १२५ ही १२५ सीसी विभागातील अग्रणी स्‍कूटर आहे आणि सादरीकरणापासून या स्‍कूटरला ग्राहकांकडून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. नवीन प्‍लॅटिनम एडिशनसह आम्‍ही डेस्टिनी पोर्टफोलिओमध्‍ये आकर्षक पर्यायाची भर करत आहोत. प्‍लेजर+ प्‍लॅटिनमला मिळालेल्‍या भरघोस प्रतिसादामुळे आम्‍हाला विश्‍वास आहे की, डेस्टिनी १२५ प्‍लॅटिनम एडिशन देखील यशस्‍वी ठरेल.’

शक्तिशाली राइड
नवीन डेस्टिनी १२५ प्‍लॅटिनममध्‍ये १२५ सीसी बीएस-६ प्रमाणित प्रोग्राम फ्यूएल इंजेक्‍शन इंजिनसह ‘एक्‍ससेन्‍स टेक्‍नोलॉजी’ समाविष्‍ट आहे. हे इंजिन ७००० आरपीएममध्‍ये ९ बीएचपीचे उल्‍लेखनीय पॉवर आऊटपुट आणि ५५०० आरपीएममध्‍ये १०.४ एनएमचे टॉर्क-ऑन-डिमांड देते.

स्‍मार्ट टेक्‍नोलॉजी
डेस्टिनी १२५ प्‍लॅटिनममध्‍ये सुधारित आरामदायी सुविधा व इंधन कार्यक्षमतेसाठी हिरोचे सर्वोत्तम व पेटण्‍टेड आय३एस (इडल-स्‍टॉप-स्‍टार्ट सिस्‍टम) आहे. तसेच डिजिटल-अॅनालॉग स्‍पीडोमीटर, साइड स्‍टॅण्‍ड इंडीकेटर आणि सर्विस ड्यू रिमांइडर सर्वोत्तम राइडची खात्री देतात.

स्‍टायलिश
नवीन डेस्टिनी १२५ प्‍लॅटिनममध्‍ये क्रोम हँडल बार एण्‍ड्स आणि नवीन क्रोम मिरर्स आहेत, जे स्‍कूटरला रेट्रो लुक देतात. क्रोम मफलर प्रोटेक्‍टर व क्रोम फेण्‍डर स्‍ट्राइप स्‍टाइल व टिकाऊपणामध्‍ये अधिक भर करतात. प्रिमिअम ३डी लोगो प्‍लॅटिनम बॅजिंग, कलर्ड सीटसह प्‍लॅटिनम हॉट स्‍टॅम्पिंग हे सिग्‍नचेर आकर्षक घटक आहेत.

नवीन कलर थीम
नवीन मॅट ब्‍लॅक कलर, ब्राऊन इनर पॅनल्‍स व व्‍हाइट रिम टेप या रंगांनी स्‍टाइल दर्जामध्‍ये अधिक आकर्षकतेची भर केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button