हार्टफुलनेस संस्थेच्या निबंध लेखन उपक्रमाचे विजेते जाहीर
मुंबई : हार्टफुलनेस एज्युकेशन ट्रस्टने त्यांच्या निबंध उपक्रमाच्या २८ व्या आवृत्तीचे विजेते घोषित केले, जो सप्टेंबर 2020 मधे प्रस्तुत केला गेला होता. वसंत पंचमीच्या पवित्र प्रसंगी एका व्हर्च्युअल कार्यक्रमाद्वारे, 40 राष्ट्रीय विजेते आणि जवळपास 280 राज्यस्तर विजेते यांची घोषणा झाली, ही घोषणा हार्टफुलनेसचे मार्गदर्शक कमलेश पटेल (दाजी) यांनी उपासना कमिनेनी;अपोलो हॉस्पिटल्सच्या उपाध्यक्ष, पुलेला गोपीचंद; मुख्य राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक; पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी, अभिनव बिंद्रा; संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी; अभिनव फ्युच्युरिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आणि माजी ऑलिम्पियन, तसेच मानसी जोशी; भारतीय पँराबॅडमिंटन खेळाडू; सध्याची जागतिक चॅम्पियन आणि परिवर्तक यांच्यासमवेत मिळून केली. या सर्व आघाडीच्या लोकांनी या कार्यक्रमादरम्यान त्यांच्या जीवनात प्रत्यक्ष घडलेल्या घटना सांगून विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
प्रत्येक वर्षी, श्री रामचंद्र मिशनचा हिस्सा असलेली, हार्टफुलनेस एज्युकेशन ट्रस्ट, UNIC – युनायटेड नेशन्स इन्फॉर्मेशन सेंटर फॉर इंडिया अँड भूतान, यांच्या सहयोगाने, युवकांना, त्यांच्या जीवनात मूल्याधारित शिक्षण आत्मसात करण्याची प्रेरणा देण्यासाठी, हा कार्यक्रम आयोजित करते. महामारीचे आव्हान असूनसुद्धा निबंध उपक्रमाची सातत्यता, देशभरातील ३०,०००पेक्षा जास्त विद्यार्थी, आणि ५००० शैक्षणिक संस्थांच्या सहभागाने अबाधित राहिली, ज्यांनी इंग्लिश आणि १० प्रांतीय भाषांमध्ये, “विचार प्रदूषण – सगळ्या रोगांचे मूळ कारण” आणि “दारिद्र्य म्हणजे केवळ पैशांचा अभाव नाही.” या विषयांवर निबंध लिहिले.
याप्रसंगी बोलताना, हार्टफुलनेसचे मार्गदर्शक कमलेश पटेल ( दाजी ) म्हणाले, “आपण माहितीने खचाखच भरलेल्या अशा वातावरणात राहत आहोत. आपण चिंतनाची, मननाची आणि चर्चेची कला गमावली आहे, ज्यामुळे आपल्या तरुण पिढीची मानसिकता प्रचंड प्रमाणात प्रभावित झाली आहे. निबंध उपक्रम हा, आजच्या युवकांमध्ये हे गुण अंगी बाणवण्यासाठी, त्यांना मूल्यांवर आधारित जीवन जगण्याला प्रोत्साहित करण्यास सक्षम असा आहे. हार्टफुलनेस पारंपारिक, शाश्वत आणि परिणामकारक शिक्षण पद्धती जतन करीत आहे, जेणेकरून, तरुणांच्या मनाला शहाणपणाचे खाद्य पुरवले जाईल व ते उद्याचा चांगला समाज घडवू शकतील.”
मिस उपासना कमिनेनी , संस्थापक URLife.co.in आणि उपाध्यक्ष CSR, अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप, म्हणाल्या, “मूल्याधारित जीवनाला प्रोत्साहन देणाऱ्या, 28 वर्षे जुन्या चळवळीचा हिस्सा बनण्यासाठी तरुण मनांची आणि शैक्षणिक संस्थांची सलग रुची आणि प्रतिबद्धता प्रेरणादायी आहे.मनन आणि चिंतन हे फक्त चांगल्या समाजासाठीच नाही, तर एखाद्याच्या निरोगी राहण्यासाठी सुद्धा निर्णायक पैलू आहेत. मी तुमच्यापैकी प्रत्येकाचे अभिनंदन करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते.”
मिस्टर अभिनव बिंद्रा, संस्थापक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी, अभिनव फ्युच्यूरिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आणि माजी ऑलिंपियन म्हणाले, “ तरुण मनांना धारदार करणारे कार्यक्रम आता काळाची गरज आहेत. आपल्या युवकांनी सगळ्या क्षेत्रात चमकण्यासाठी, त्यांच्यासाठी चांगल्या संधी निर्माण करणे हे आपल्याला अत्यावश्यक आहे . स्पर्धा हा असाच एक मंच असतो जेथे लाखो विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते.”
पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमीचे पुलेला गोपीचंद; मुख्य राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक, म्हणाले, “खेळातील असो की जीवनातील असो कोणत्याही उत्कृष्टतेचा पाया हा मूल्यांवर रचला जातो. आम्ही या अॅकॅडमीत अनेक जागतिक दर्जाचे बॅडमिंटन खेळाडू तयार करू शकलो, ते मानसिक व शारीरिक शिस्तीवर अतिशय कठोरपणे लक्ष दिल्यामुळे. आजच्या युवकांना ध्येयाप्रत जाण्यासाठी त्यांच्या विचारप्रक्रियेत शिस्त कशी आणायची, या विषयी मार्गदर्शनाची गरज असते.”
मानसी जोशी, भारतीय पॅरा बॅडमिंटन खेळाडू म्हणाली, “आयुष्यात आलेल्या सर्व आव्हानांवर मात करणे तेव्हाच शक्य होते जेव्हा आपण अंतस्थ शक्तीबरोबर जोडलेले असतो.. आपली अंगभूत क्षमता कमाल मर्यादेपर्यंत कशी वाढवायची यात आयुष्यातील सुरूवातीच्या वर्षांची महत्त्वाची भुमिका असते. त्या शक्तीशी जोडण्यासाठी सतत आत्मपरिक्षण करण्याची गरज असते आणि ही क्षमता शक्य तितक्या लवकर विकसित करावी लागते. या कार्यक्रमाद्वारे हार्टफुलनेस संस्था देशभरातील लक्षावधी युवकांना प्रेरणा देण्याचे हे काम करत आहे याचा मला आनंद आहे.”
वार्षिक ’हार्टफुलनेस निबंध उपक्रम’ ही एक अद्वितीय स्पर्धा आहे. त्याची सुरूवात १९९२ मधे झाली. सखोल मनन, चर्चा आणि चिंतनाद्वारे मुल्याधारित विचार करण्याची ओळख करून देऊन युवा मनांना आकार देऊन उद्याचे नेतृत्व तयार करणे हा दृष्टिकोन या मागे होता. या स्पर्धेमधे भाग घेणार्यांना त्यांच्या समवयस्कांबरोबर, शिक्षकांबरोबर आणि इतरांबरोबर विचारविनीमय करण्यास बराच वेळ दिला जातो. यात भाग घेणारे त्यांच्या स्वत:च्या अनुभवानुसार या विषयावर चिंतन व मनन करून आपल्या निबंधाला आकार देतात.