लाईफस्टाईल

हार्टफुलनेस कार्यक्रम विश्वासाठी आशेचा दीपस्तंभ : पंतप्रधान मोदी

दाजींच्या आध्यात्मिक नेतृत्वाखाली श्री राम चंद्र मिशन संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी

नवी दिल्ली : पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी त्यांच्या सांगता समारोपाच्या भाषणात श्री राम चंद्र मिशनला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सहजमार्ग अभ्यासींचे (हार्टफुलनेस ध्यान) अभिनंदन केले आणि जीवनातील अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी योग आणि ध्यान यांचा अंगीकार करण्याच्या आवश्यकतेवर जोर दिला.  श्री राम चंद्र मिशनचे अध्यक्ष आणि हार्टफुलनेसचे मार्गदर्शक, श्री कमलेश पटेल (दाजी) यांच्यासह लाखो अभ्यासी ( हार्टफुलनेसची साधना करणारे) आणि नवीन जिज्ञासू समारोपाच्या या व्हर्च्युअल समारोहात सामील झाले होते. श्री राम चंद्र मिशनच्या (सहजमार्ग या नावाने परिचित असलेल्या) देखरेखीखाली हार्टफुलनेस, जगभरातील १५० देशांमधील लाखो लोकांमध्ये, प्राचीन राजयोग ध्यानपद्धतीच्या आधुनिक आवृत्तीचा प्रसार करीत आहे.  सहजरित्या अंगिकारता येणाऱ्या या पद्धतीचा आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करून जगभरातील लोक याचा लाभ घेत आहेत.

पंतप्रधान मोदींनी हार्टफुलनेसचे मार्गदर्शक श्री कमलेश पटेल उर्फ दाजी यांच्या अथक प्रयत्नांची वाखाणणी करत म्हटले की आजच्या जगात वेगावर जास्त भर दिला जातो. लोकांकडे वेळेची कमतरता आहे. अशा काळात सहज मार्गाच्या माध्यमातून लोकांना उत्साही आणि निरोगी ठेवून तुम्ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असे योगदान देत आहात. तुमचे हजारो स्वयंसेवक आणि प्रशिक्षक जगाची योग आणि ध्यानाशी ओळख करून देत आहेत. ही मानवतेची महान सेवा आहे. तुमच्या स्वयंसेवकांनी आणि प्रशिक्षकांनी ज्ञानाचा खरा अर्थ वास्तवात आणला आहे. आपले प्रिय कमलेश पटेल यांना आध्यात्मिक जगतामध्ये दाजी म्हणून ओळखले जाते. मी इतकेच म्हणू शकतो की ते पाश्चिमात्य जग आणि भारत यांच्यातील चांगल्या गुणांचा संगम आहेत. दाजींच्या आध्यात्मिक नेतृत्वाखाली श्री राम चंद्र मिशन संपूर्ण जगाला आणि विशेषतः तरुणांना निरोगी शरीर आणि निरोगी मनाकडे  जाण्यास प्रेरणा देत आहे

उपस्थित लोकांना संबोधित करताना श्री कमलेश पटेल (दाजी), हार्टफुलनेसचे मार्गदर्शक म्हणाले, “हार्टफुलनेस ध्यानाचे परिवर्तनकारी फायदे, आमच्या पद्धतीच्या एकमेवाद्वितीय प्राणाहुतीच्या (जीवन शक्तीच्या) संप्रेषणावर अवलंबून आहे. ती प्राणाहुती जिज्ञासूंना, ध्यानाला त्यांच्या दैनंदिन जीवनाचा  भाग बनवणे सोपे होण्यासाठी आणि त्याचा लाभ घेण्यासाठी मदत करते. जगभरातील लोकांना प्राचीन परंपरेची शिकवण विनामूल्य देणाऱ्या आणि त्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या हार्टफुलनेस संस्थेचे वेगळेपण उठून दिसणारे आहे. हार्टफुलनेस पद्धती ही शांती मिळवण्याचा, समाधीकडे नेण्याचा खात्रीशीर मार्ग आहे. ती सखोल ध्यानाची आणि परमानंदाची अवस्था  काही आठवड्यातच देण्यासाठी ओळखली जाते.

पंतप्रधानांनी प्रारंभीच हार्टफुलनेस च्या साधकांचे अभिनंदन करून त्यांना प्रेरित केले की 75 वर्षांचा हा मैलाचा दगड देशाच्या जडणघडणीतील आणि समाजाला सशक्तपणे पुढे नेण्यातील महत्त्वाचा टप्पा आहे.  या ध्येयाप्रती असलेल्या तुमच्या प्रतिबद्धतेचा हा परिणाम आहे की आज ही संस्था जगभरातील 150 हून अधिक देशांमध्ये पसरलेली आहे.

 

हार्टफुलनेसच्या हैदराबाद येथील वैश्विक मुख्यालयाबद्दल संदर्भ देताना ते म्हणाले, “मला सांगण्यात आले आहे की कान्हा शांतिवनम हे ज्या भागात उभारले आहे ती एक ओसाड जमीन होती. हे तुमचे (दाजी) समर्पण आणि प्रतिबद्धता आहे जिने  त्या जमिनीला हिरव्यागार अशा कान्हा शांतिवनममधे परिवर्तित केले. आपले भाषण पुढे चालू ठेवताना ते म्हणाले की, विशेषत: कोविड-१९ नंतर सर्व जग आरोग्य आणि कल्याण याकडे अतिशय गंभीरपणे बघत आहे. याबाबतीत भारत बरेच काही प्रदान करू शकतो. आपले योग आणि आयुर्वेद हे एक सशक्त जग बनवण्याकरिता बरेच योगदान देऊ शकते. आपण शास्त्रीय पद्धतीने त्यांचे फायदे विशद करून सांगावे आणि पुन: आरोग्यदायी व टवटवीत होण्यासाठी जगाला आमंत्रित करावे. तुमची हार्टफुलनेस ध्यानपद्धती ही त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

कमी लक्ष दिल्यामुळे जगभर मानसिक स्वास्थ्याचे प्रश्न हे कोविड-१९ नंतर प्रकर्षाने जास्त बळावले आहेत. प्रसिद्ध संस्थांच्या अभ्यासात हेच दिसले आहे की हार्टफुलनेस ध्यान आणि इतर कोणतेही ध्यान ताण-तणाव, भिती-चिंता कमी करते, आणि सर्वांगिण स्वास्थ्य वाढवते. नवीन समस्या निर्माण होण्यापासून टाळण्यामधे ध्यान आणि योग यांची महत्त्वाची भूमिका असेल आणि एक जास्त संतुलित व सुसंगत जीवन जगण्याकरिता या साधनांना आपण अंगिकारले पाहिजे.

 

दाजी म्हणाले, “कर्माद्वारेच आपण ब्रह्मविद्येकडे जातो. श्रमामधूनच आपण भौतिक जगात वेगाने विस्तारित होतो. दोन्हींची आवश्यकता असते. भारताने जगाचे नेतृत्त्व करणे आणि इतर जनसमुदायाला अध्यात्माकडे घेऊन जाणे हा एक इश्वरीय संकेत आहे. अध्यात्म म्हणजे एकीकरण, आणि परस्परांशी जोडले जात सर्वोच्च ध्येय साध्य करून कोणत्याही प्रतिबंधा शिवाय आपण एक व्हायला हवे.”

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button