स्पोर्ट्स

शाहिद आफ्रिदीचा विश्वविक्रम

कराची : पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शाहिद आफ्रिदी यानं ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणाऱ्या आफ्रिदीनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात १०० विकेट्स घेण्याचा विक्रम नावावर केला. त्यानं जसप्रीत बुमराह याचा विक्रम मोडला. बुमराहनं यापूर्वी २३ वर्ष व ५७ दिवसांचा असताना ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये १०० विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता. आफ्रिदीनं २० वर्ष व ३२६ दिवसांचा असताना ट्वेंटी-20त १०० विकेट्स घेतल्या.

आफ्रिदीनं पाकिस्तान सुपर लीगच्या सातव्या सामन्यात ही पराक्रम केला. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात १०० विकेट्सचा विक्रम तसा अफगाणिस्तानच्या मुजीब उर रहमान याच्या नावावर आहे. त्यानं १८ वर्ष व २७१ दिवसांचा असताना हा पराक्रम केला. पण, आफ्रिदी हा सर्वात सर्वात युवा जलदगती गोलंदाज ठरला. त्यांच्या व्यतिरिक्त राशिद खाननं १८ वर्ष व ३६० दिवसांचा असताना ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये विकेट्सचे शतक पूर्ण केले होते. पाकिस्तानच्या शादाब खान यानंही २० वर्ष व १४८ दिवसांचा असताना आणि इंग्लंडच्या डॅनी ब्रिग्स यानं २३ वर्ष व ५६ दिवसांचा असताना हा पराक्रम केला.

पाकिस्तान सुपर लीगमध्ये आफ्रिदी मुल्तान सुल्तान्सनं लाहोर कलंदर्स संघाला ७ विकेट्सनं पराभूत केलं. मुल्ताननं मोहम्मद रिझवानच्या ७६ धावांच्या खेळीच्या जोरावर हा विजय मिळवला. रिझवाननं ४९ चेंडूंत १२ चौकार लगावले. कलंदर्सनं प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १५७ धावा केल्या. या सामन्यात आफ्रिदीनं दोन विकेट्स घेतल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button