वोडाफोन आयडिया फाऊंडेशन स्कॉलरशिप्स २०२१ ची सुरुवात
मुंबई : वी चे कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम राबवणाऱ्या वोडाफोन आयडिया फाऊंडेशनने ‘लर्निंग विथ वोडाफोन आयडिया स्कॉलरशिप’ प्रोग्रामअंतर्गत २०२१-२२ वर्षासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी अर्ज मागवले आहेत. अधिकाधिक चांगली कामगिरी करण्यासाठी आवश्यक संसाधनांची उपलब्धता आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची क्षमता यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांना ज्या सामाजिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो त्या दूर करणे हा वी सीएसआर उपक्रमाचा उद्देश आहे.
२०२० साली सुरु करण्यात आलेल्या या शिष्यवृत्ती शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मंजुरी देण्यात आलेल्या खर्चांचा निर्देश असलेल्या डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर (डीबीटी) साठी पात्रता दिली जाते. या शिष्यवृत्ती शिक्षकांसाठी मेरीटच्या आधारे तर विद्यार्थ्यांसाठी मेरीट तसेच त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या साधनांचा विचार करून दिल्या जातात. ही निवड प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन होते, यासाठी स्वतंत्र ज्युरी असतात, ज्यामध्ये नामवंत शिक्षक, नागरी समाज संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश असतो.
वोडाफोन आयडिया फाऊंडेशनतर्फे शिक्षकांना १ लाख रुपयांची रोख शिष्यवृत्ती आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक संसाधने मिळवण्यात मदत करण्यासाठी २०,००० रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. यावर्षीच्या शिष्यवृत्ती कार्यक्रमाची सुरुवात करताना वोडाफोन आयडिया लिमिटेडचे चीफ रेग्युलेटरी अँड कॉर्पोरेट अफेयर्स ऑफिसर श्री. पी बालाजी यांनी सांगितले, “आपले तंत्रज्ञान कौशल्य आणि नेटवर्क यांचा उपयोग करून सामाजिक प्रभाव निर्माण करण्यासाठी वी कटिबद्ध आहे. रोजगारक्षमतेमध्ये सुधारणा घडवून आणून, देशातील गरिबी कमी करण्यासाठीच्या मूलभूत उपायांपैकी एक म्हणजे शिक्षण उपलब्ध करून देणे. आमचे असे ठाम मत आहे की, आर्थिक अडसर असल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला किंवा शिक्षकाला त्यांच्या खऱ्या क्षमतांनुसार विकास घडवून आणण्यापासून रोखले जाऊ नये.”
पात्रता निकष:
तीन वर्षांचा अनुभव असलेले, सरकारी / सरकारी अनुदान-प्राप्त शाळांमधील किंवा कमी उत्पन्न असलेल्या खाजगी शाळांमधील पूर्णवेळ शिक्षक या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. ते इयत्ता आठवी आणि त्यावरील वर्गांना शिकवत असले पाहिजेत आणि त्यांच्याकडे मान्यताप्राप्त शैक्षणिक पुरस्कार, पेपर्स, शिक्षण-अभ्यासातील नाविन्यपूर्ण उपक्रम आणि कन्टेन्ट निर्मिती अशा स्वरूपात त्यांच्या क्षमता दर्शवणारे पुरावे असले पाहिजेत.
इयत्ता सहावी ते बारावीच्या वर्गांचे सरकारी / सरकारी-अनुदान-प्राप्त शाळांमधील विद्यार्थी, ज्यांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक किंवा अभ्यासाव्यतिरिक्त इतर यश मिळवले आहे, या वी सीएसआर स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकतात. शिष्यवृत्ती विजेते या निधीचा उपयोग आयटी उपकरणे (लॅपटॉप, प्रिंटर) विकत घेण्यासाठी आणि अभ्यासक्रमांचे शुल्क, शालेय पुस्तके, मासिके, शाळेची ट्युशन फी आणि शाळेशी संबंधित इतर आवश्यक खर्चांसाठी करू शकतात.
अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी कृपया याठिकाणी क्लिक करा: www.learningwithvodafoneidea.in/vi-scholarships