Uncategorizedराजकारण

एक फडणवीस क्या करेगा, महाराष्ट्र एक तरफ है…!

सुप्रिया सुळे यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान

नवी मुंबई : देवेंद्र फडणवीस म्हणाले होते पवारसाहेबांनी रिटायर्ड व्हावं. छान मार्गदर्शन केले होते. मात्र महाराष्ट्राने पवारसाहेबांना रिटायर्ड करायचं नाही हे ठरवलं होतं. त्यामुळे ‘एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा महाराष्ट्र एक तरफ और देवेंद्र फडणवीस एक तरफ’ असा जोरदार टोला लगावतानाच पवार साहेब म्हटले असते मी आता देवेंद्र फडणवीस बोलत आहेत तर रिटायर्ड होतो, परंतु महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात नाही ना तसं असे सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्ट करत राज्याच्या राजकारणातून शरद पवारांना रिटायर्ड करून दाखवावे असे आव्हान दिले.

शिवाय नवी मुंबईकरांच्या मनात’ त्या’ घोड्याची फिल्म छान झालीय त्यामुळे ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है म्हणून आपल्याला पिक्चर बघायचा आहे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शिवजयंतीनिमित्त नवी मुंबईत आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलात होत्या. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पक्षात दीड वर्षांपूर्वी कोण टिकेल, कोण लढेल आणि कोण लढणार नाही अशी परिस्थिती होती. रोज उठून आज कोण पक्षातून गेला याची चिंता असायची आणि कोण पक्ष सोडून गेला नाही की बरं वाटायचं अशी आठवण सांगतानाच ५२ लोक पवारसाहेबांना सोडून गेले होते. त्यातील एकही आमदार म्हणून निवडून आला नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे असल्याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.

२०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं झालं ते २०१९ मध्ये भाजपचं झालं. त्यातून सेना वाचली. त्यांच्या पटकन लक्षात आले. दाल मे काला है इधरसे निकलो. उध्दवजींनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे आणि त्यातूनच महाविकास आघाडीची स्थापना झाली. केंद्र सरकार मध्ये सव्वा वर्षात कुठलीही टिका करु शकले नाही. कारण ते जेव्हा खाली बोलतात तेव्हा त्यांना पूर्ण ताकदीने महाविकास आघाडी उत्तर महाराष्ट्रात दिले आहे. त्यामुळे प्रत्येक जण महाविकास आघाडीचे मॉडेल देशात यायला हवे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पवारसाहेबांना राजकारणात ५५ वर्षे झाली. त्यातली २५ वर्ष सत्तेत गेली तर २५ वर्ष विरोधात गेली. या ५५ वर्षात महाराष्ट्रातील जनतेने पवारसाहेबांना कधी अंतर दिले नाही ही गोष्ट राष्ट्रवादी पक्ष हे कुटुंब म्हणून लक्षात ठेवले आहे तसे सगळ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे असे सांगतानाच सत्ता येते आणि जाते. सत्ता ही सेवा करण्यासाठी असते ती पदासाठी नसते ना लाल दिव्यासाठी असते हे लक्षात ठेवा असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान या मेळाव्यात नवीमुंबईत सत्ता परिवर्तन एक हजार एक टक्के होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे असे आश्वासन देत कार्यकर्त्यांनी साताऱ्याच्या सभेचा फोटो लक्षात ठेवा हे सांगताना पुढचा महापौर हा महाविकास आघाडीचाच होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

गणेश नाईक पक्षात असताना कसा त्यांचा सन्मान पक्षात होत होता हे सांगताना ब्लॅंक पेपरवर सही होऊन नवी मुंबईत उमेदवारांची नांवे टाकली जात होती. नाईकसाहेबांच्या घरात अन्न खाल्लं आहे. त्यामुळे अन्नाशी गद्दारी कधीच नाही ते कितीही वागले तरी असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपा आमदाराच्या गुंडागर्दीचा व्हिडीओ समोर आला असून त्यावर बोलताना हा विषय राष्ट्रीय सुरक्षिततेचा आहे. माझ्या देशाचा प्रश्न आहे त्यांच्या सुरक्षिततेचा आहे त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात एसआयटी नेमून चौकशी करण्याची मागणी करतानाच देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या शब्दानुसार पारदर्शकपणे नक्की काय आहे यांचं उत्तर महाराष्ट्रातील जनतेला द्यावं म्हणजे दुध का दुध आणि पानी का पानी झालं पाहिजे असे खुले आव्हानही त्यांनी देत याप्रकरणी एप्रिल मध्ये होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात हा मुद्दा लावून धरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

या कार्यकर्ता मेळाव्यात कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे यांनी आपले विचार मांडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button