अर्थ-उद्योग

मेहूल चोक्सीचे ‘अँटिगा आणि बार्बुडा’चे नागरिकत्व रद्द होणार

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहार आणि मनी लाँडरिंगचा आरोप असलेल्या नीरव मोदीचं भारतात प्रत्यार्पण करण्यास काहीही हरकत नसल्याचा निकाल ब्रिटनमधील वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट्स कोर्टाचे जिल्हा न्यायाधीश सॅम गूझी यांनी गुरुवारी (25 फेब्रुवारी) दिला आहे. यांनतर आता पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचा सहआरोपी असणारा नीरव मोदीचा मामा मेहुल चोक्सीच्या अडचणींत वाढ होताना दिसत आहे. कॅरिबियन देश ‘अँटिगा आणि बार्बुडा’ने (Antigua and Barbuda) नोव्हेंबर 2017 साली गुंतवणूक कार्यक्रमांतर्गत मेहुल चोक्सीला कॅरिबियन देशांची नागरिकता बहाल केली होती. पण आता हे नागरिकत्व मागे घेण्याची प्रक्रिया अँटिगाने सुरू केली आहे. त्यामुळे मेहुल चोक्सीच्या अडचणींत वाढ होताना दिसत आहे. पण सरकारच्या या निर्णयाविरोधात चोक्सीने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

कर्जबुडव्या मेहुल चोक्सी याच नागरिकत्व गेल्या वर्षीच रद्द करण्यात आलं होतं, अशी माहिती केंद्रीय ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि अंमलबजावणी संचालनालयच्या दोन अधिकाऱ्यांनी यापूर्वीच दिली आहे. पण यानंतर चोक्सीने नागरिकत्व मागे घेण्याच्या निर्णयाविरोधात अँटिगाच्या कोर्टात खटला दाखल केला होता. सध्या हा खटला न्यायप्रविष्ट आहे. असं असलं तरी भारतातील मेहुल चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितलं की ‘माझ्या क्लायंट मेहुल चोक्सीने अँटीगाचा नागरिक असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे त्याचं नागरिकत्व मागे घेतलं जाणार नाही. तर दुसरीकडे अँटिगाचे पंतप्रधान गेस्टन ब्राउनचे चीफ ऑफ स्टाफ लिओनेल हर्स्ट यांनी सांगितलं की, मेहुल चोक्सीचं नागरिकत्व मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी बराच काळ लागू शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button