Uncategorized

महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट; शरद पवार प्रथमच ठाकरे सरकारवर नाराज

मुंबई : महाआघाडी सरकारमध्ये बिघाडी असल्याच्या बातम्या अधून मधून प्रसिद्ध होत असल्या, तरी या आघाडीचा खांब मजबूत ठेवणाऱ्या शरद पवारांकडून जोपर्यंत बातमी येत नाही, तोवर तिचं महत्त्व मोठं होत नव्हतं. आता प्रथमच ठाकरे सरकारवर शरद पवार नाराज असल्याचं समजतं.

संजय राठोड प्रकरणी शरद पवार नाराजी व्यक्त केल्याची माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण एकूणच ज्या पद्धतीने हाताळलं गेलं त्याबाबत शरद पवार समाधानी नाहीत. ते ठाकरे सरकारवर नाराज असल्याचं समजतं. मंगळवारी दुपारी संजय राठोड यांनी पोहरादेवी दर्शनाच्या निमित्ताने केलेलं शक्तिप्रदर्शन पवारांना रुचलेलं नाही. शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड हे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर 15 दिवसांनी प्रथमच माध्यमांसमोर आले. या प्रकरणी अकारण गोवण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला असतानाच आता शरद पवारांच्या नाराजीच्या बातमीने त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं चित्र आहे.

राठोड यांनी केलेलं शक्तिप्रदर्शन पवारांना आवडलेलं नाही. कोरोना काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात समर्थक या प्रकरणाचा फटका मुख्यमंत्री आणि सरकारच्या प्रतिमेला होत असल्याचं शरद पवार यांचं मत आहे. या प्रकरणी तपास पूर्ण होईपर्यंत संजय राठोड यांनी पदापासून दूर राहावं, असंही शरद पवारांचं मत असल्याचं समजतं.

दरम्यान कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन झाल्याने वाशिम पोलिसांनी 10 हजार लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहे. संजय राठोड तिथे दर्शनाला येणार आणि 15 दिवसांनंतर पहिल्यांदाच समोर येणार हे कळताच त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमारही केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button