आरोग्य
ब्रिजल फूड अँड ब्रेव्हरेजच्या नफ्यातील ५९% लाभांश समाजसेवेसाठी खर्च होणार
मुंबई :
ब्रिजल फूड अँड ब्रेव्हरेज प्रा. लि. ही कंपनी मिनरल वॉटर व्यवसायात आहे. दरवर्षी कंपनीला होणाऱ्या फायद्यातील 59% हिस्सा समाजसेवेसाठी खर्च केला जाणार आहे, अशी घोषणा ब्रिजल ऍग्रोफूड ब्रेव्हरेज प्रा. लिमिटेड चे ५९% चे शेयरहोल्डर मुकेश कुमार जैन यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान केली. संपूर्ण महाराष्ट्रातील गरीब जनतेच्या उत्तम आरोग्यासाठी, मोफत औषधे, मोफत संपूर्ण आरोग्य तपासणी यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील वाडा येथील आदिवासी पाड्यातून रक्त तपासणी लॅबोरेटरी उभारून याची सुरुवात केली जाणार आहे.
याबद्दल अधिक माहिती देताना ब्रिजल फूड अँड ब्रेव्हरेज प्रा. लिमिटेड चे ५९% भागीदार मुकेश कुमार जैन म्हणाले की, कंपनीला होणाऱ्या फायद्यातून काही हिस्सा समाजसेवेसाठी, गरीब जनतेच्या उत्तम आरोग्यासाठी, त्यांना वैद्यकीय सेवेसाठी खर्च करून एक सामाजिक सेवा सुरु करण्याचा व समाजासाठी काही करण्याचा आमचा प्रयत्न आहे. देवाच्या कृपेने माझ्या मनात हा भाव जागा झाला आहे. त्यासाठी आज मी घोषणा करतो की, मी या कंपनीचा ५९% चा शेयर होल्डर आहे, दरवर्षी मला कंपनीकडून जो काही लाभांश मिळेल त्यातील १९% लाभांश माझ्या कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी देण्यात येईल, तर ४०% लाभांश संपूर्ण महाराष्ट्रात रक्त तपासणी लॅबेरेटोरी व वैद्यकीय तपासणी लॅबोरेटरी तयार करण्यामध्ये खर्च केला जाईल. त्याची सुरुवात आम्ही ठाण्यातील वाडा येथील आदिवासी पाड्यात, तेथील आदिवासी गरीब जनतेसाठी रक्त तपासणी लॅबोरेटरी उभारून करत आहोत. कारण येथील लोकांना पुरेशी वैद्यकीय सुविधा मिळत नाही. तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर अशाच प्रकारे गरीब जनतेसाठी रक्त तपासणीसाठी व वैद्यकीय तपासणी साठी लॅबोरेटरी उभारण्याचा आमचा मानस आहे.