बंगालच्या कोर्टाचे अमित शहांना समन्स

कोलकाता : पश्चिम बंगालमधील बिधाननगरच्या स्पेशल कोर्टाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना 22 फेब्रुवारीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. हा समन्स तृणमूल खासदार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जीचे भाच्चे अभिषेक बॅनर्जींच्या मानहाणी प्रकरणात पाठवला आहे. कोर्टाने शहा यांना म्हटले की, स्वतः हजर रहा किंवा आपला वकील पाठवा.
काय आहे प्रकरण ?
११ ऑगस्ट २०१८ ला कोलकातामध्ये एका रॅलीदरम्यान शहा यांच्या वक्तव्याचा विरोध करत अभिषेक बॅनर्जी यांना शहांविरोधात मानहाणीचा खटला दाखल केला होता. शहा त्या रॅलीमध्ये म्हणाले होते की, ‘ममता बॅनर्जी यांच्या काळात नारदा, शारदा, रोज व्हॅली, सिंडिकेट करप्शन, भाच्चा करप्शन झाले.’ अभिषेक यांनी आपल्या तक्रारीत अजून एका वक्तव्यावर आक्षेप नोंदवला होता. यात शहा म्हणाले होते की, ‘बंगालच्या गावातील लोकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ लाख ५९ हजार कोटी पाठवले होते, ते कुठे गेले ? हे पैसे भाच्चा आणि सिंडिकेटला गिफ्ट केले.’