राजकारण

पश्चिम बंगालमध्ये कारमध्ये कोकेन; भाजपच्या महिला नेत्याला अटक

कोलकाता : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील घडामोडींना वेग आला आहे. भाजपसह सर्वच पक्ष सध्या कामाला लागले आहेत. दरम्यान, कोलकातामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंगालमधील भाजपच्या युवा मोर्चाची एक महिला नेता अडचणीत आली आहे. या महिला नेताचे नाव पामेला गोस्वामी असं आहे. पामेला हिने कारमध्ये कोकेन हे ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी तिला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडलं आहे.

पामेला गोस्वामी आपल्या कारमधून कोकेन हे ड्रग्ज घेऊन जात होती. पोलिसांना याबाबत खबर मिळाली. या माहितीच्या आधारावर त्यांनी कारवाई केली. या कारवाईत गोस्वामी रंगेहाथ पकडली गेली. पोलिसांनी कोलकाताच्या न्यू अलीपूर भागात तिची गाडी अडवली. यावेळी गाडीत तिच्यासोबत एक सुरक्षा रक्षकही होता. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता गाडीत लाखो रुपयांचे ड्रग्ज मिळाले.

ही कारवाई करण्याआधीच पोलिसांना पामेला गोस्वामीवर संशय होता, अशी माहिती समोर येत आहे. पामेला एका विशिष्ट ठिकाणी थांबायची. तिथूनच कोकेनचं देवाणघेवाण केलं जायचं. गेल्या काही दिवसांपासून पोलीस पामेलाच्या हालचालींवर नजर ठेवून होते. त्यानुसार त्यांना हळूहळू याबाबतची अधिकची माहिती मिळत गेली. अखेर आज पामेला कारमधून ड्रग्ज घेऊन जात असल्याचं पोलिसांना कळालं. त्यानंतर पोलिसांनी तिची कार अडवत झडती घेतली. यावेळी पोलिसांना तिच्या बॅगेत आणि कारच्या सीटमध्ये कोकेन मिळालं. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.

पामेलाच्या मित्रालाही अटक
दरम्यान, पामेला गोस्वामीला अटक केल्यानंतर पोलिसांनी तिचा मित्र प्रबीर कुमार डे यालाही अटक केली. पोलिसांनी प्रबीरला कोलकाताच्या अलिपूर येथील एनआर एनेन्यू या भागातून अटक केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button