Uncategorizedराजकारण

कोरोना संकटात राज्य गुप्तवार्ता विभागाच्या मुंबईबाहेर बदल्या

मुंबई : महाराष्ट्रात व प्रामुख्याने मुंबईत कोरोनाचे थैमान सुरु आहे व आजही राज्य सरकार अनेक जिल्ह्यात संचारबंदिचे आदेश देत आहे असे असतानाही राज्य गुप्तवार्ता विभागाने मात्र मुंबई विभागात कार्यरत असणाऱ्या वरिष्ठ गुप्तवार्ता अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबईबाहेर 300 ते 350 किलोमीटर लांब करून ग्रामीण भागांतील जनतेचा आरोग्य धोक्यात आणल आहे तसेंच स्वतःच्या कर्मचारी वर्गाचेही गैरसोय केली आहे

कोरोना परिस्थितीत मुंबईहुन आलेल्या लोकांना राहण्याची मोठी गैरसोय होणार आहे तसेच अनेक वेळा मुंबईहुन ये जा करणार असल्याने ग्रामीण भागात कोरोना प्रादुर्भाव वाढणार असल्याची दाट शक्यता आहे असे असतानाही या गंभीर परिस्थितीत मुंबईतील वरिष्ठ गुप्तवार्ता अधिकारी वर्गाचे बदल्या मुंबईबाहेर करून नेमके साध्य काय होणार आहे याच कारण समजणं अवघड आहे

26/11 च्या हल्यानंतर राज्य गुप्तवार्ता विभागात सरळसेवा भरती करण्यात आली राज्यातील सर्वात हुशार कर्तबगार तरुणांना गुप्तवार्ता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली परंतु अनेक वर्ष प्रमोशन मिळत नाही म्हणून गुप्तवार्ता अधिकारी हे महाराष्ट्र ऍडमिनीस्ट्रेशन प्राधिकरणत धाव घेतली व खटला जिंकले न्यायलयाच्या आदेशानुसार राज्य गुप्तवार्ता विभागाला गुप्तवार्ता अधिकाऱ्याना वरिष्ठ गुप्तवार्ता अधिकारी म्हणून बढती दयावी लागली
मात्र बढती देताना राज्य गुप्तवार्ता विभागाने मुंबईत कार्यरत असणाऱ्या सर्व अधिकारी वर्गाच्या बदल्या मुंबईबाहेर 300 ते 350 किलोमीटर लांब करण्यात आल्या आहेत बदली झालेल्यापैकी काही अधिकाऱ्याच्या आई, वडील, पत्नी, मुलांचे उपचार मुंबईत सुरु आहेत काही महिलां कर्मचारी गर्भवती आहेत परंतु कुठलीच तमा न बाळगता सदर बदल्या केल्या गेल्या आहेत. या सगळ्या खेळात अधिकारी वर्गाचे मोठे हाल होत असून ग्रामीण भागांतील सर्वसामान्य जनतेचेही आरोग्य धोक्यात येणार आहे तेव्हा या चुकीच्या पद्धतीने केल्या गेलेल्या बदल्या त्वरित रद्द होणे गरजेचे आहे असा सूर अधिकारी वर्गातून येत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button