अर्थ-उद्योग

कॅटरपिलरचा भारतामध्‍ये सुवर्णमहोत्सव

मुंबई : कॅटरपिलर या जगातील सर्वात मोठ्या बांधकाम व खाणकाम उपकरणांच्‍या उत्‍पादक कंपनीने भारतामध्‍ये उत्‍पादन कार्याची ५० वर्षे पूर्ण केली आहेत. कंपनीचा त्‍यांच्‍या मशिन्‍सना उद्योगक्षेत्रातील अग्रणी तंत्रज्ञानासह सुसज्‍ज करण्‍याचा दीर्घकालीन वारसा आहे, ज्‍यामुळे त्‍यांच्‍या कार्यसंचालन विभागांची सुरक्षितता, उत्पादकता व कार्यक्षमता वाढते. जागतिक स्‍तरावर कॅटरपिलरचा उत्‍पादन सहाय्यक कौशल्‍याचा ९५ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव असण्‍यासोबत मोठे इन्‍स्‍टॉलेशन कार्य (जवळपास २ दशलक्ष अस्‍सेट्स) आणि अंदाजे १६०,००० कर्मचा-यांसह १९३ देशांना सेवा देणारे प्रबळ विश्‍वव्‍यापी डिलर नेटवर्क आहे.

कंपनी १९३० पासून भारतामध्‍ये कार्यरत राहिली आहे. कॅटरपिलरने आता सहा अत्‍याधुनिक उत्‍पादन सुविधा, दोन आरअॅण्‍डडी केंद्रे, पाच उपकंपन्‍या, आठ कॅटरपिलर ब्रॅण्‍ड्स आणि विविध जागतिक सहाय्यक कंपन्‍या स्‍थापित केल्‍या आहेत. कंपनीचे धोरण भारत व जगभरातील ग्राहकांच्‍या गरजांची दर्जात्‍मक उत्‍पादन उपाययोजना व नाविन्‍यपूर्ण सेवेसह पूर्तता करण्‍याप्रती वारसा व अद्वितीय कटिबद्धतेला दाखवते. कॅटरपिलर आणि तिच्‍या प्रबळ डिलर नेटवर्कमध्‍ये ११,००० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत आणि भारतातील त्‍यांच्‍या स्‍थानिक पुरवठ्यासह हा आकडा अधिक आहे.

”कॅटरपिलर अनेक दशकांपासून भारताच्‍या विकासगाथेचा भाग राहिली आहे. आम्‍ही १९३० पासून प्रमुख भागीदार राहिलो आहोत आणि वर्षानुवर्षे या महान देशामधील प्रगती अत्‍यंत उल्‍लेखनीय आहे,” असे कॅटरपिलरचे अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी जिम उमप्‍लेबी म्‍हणाले. यूएस-भारत धोरणात्‍मक सहयोगामधील बोर्ड सदस्‍य देखील असलेले उमप्‍लेबी म्‍हणाले की, आमच्‍या भारतीय टीमची ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्‍याप्रती समर्पितता व कटिबद्धता हा सुवर्ण टप्‍पा संपादित करण्‍यामध्‍ये महत्त्वाचे राहिले आहेत.

”हे वर्ष सुवर्णमहोत्‍सवी वर्धापन दिनाला साजरे करते. आम्‍ही भारतातील उत्‍पादन कार्याची ५० वर्षे पूर्ण करत आहोत,” असे कॅटरपिलर इंडियाचे कंट्री मॅनेजर बन्‍सी फन्‍सालकर म्‍हणाले. ते पुढे म्‍हणाले, ”१९४८ मध्‍ये भाक्रा नांगल धरण प्रकल्‍पाच्‍या बांधकामासाठी कॅट® उपकरण वापरण्‍यात आले, ही उल्‍लेखनीय बाब आहे. कॅटरपिलर भारतभरातील खाणकाम, बांधकाम, परिवहन, ऊर्जा निर्मिती व पायाभूत सुविधा विकास कार्यांला साह्य करत आली आहे.”

कॅटरपिलरच्‍या शाश्‍वत समुदायाप्रती कटिबद्धतेबाबत बोलताना श्री. फन्‍सालकर म्‍हणाले, ”आम्‍ही राहत असलेल्‍या, तसेच कार्यरत असलेल्‍या समुदायांच्‍या उन्‍नतीसाठी दर्जेदार शिक्षण, शुद्ध पाण्‍याची उपलब्‍धता, स्‍वच्‍छता, आरोग्‍य व कौशल्‍य विकासावर लक्ष केंद्रित करणारे विविध सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्‍पॉन्सिबिलिटी) उपक्रम राबवतो.”

कॅटरपिलर ही बांधकाम व खाणकाम उपकरणाची सर्वात मोठी निर्यातदार कंपनी आहे आणि भारत व जगभरातील ग्राहकांना जागतिक दर्जाची उत्‍पादने व विक्री-पश्‍चात्त सेवा उपाययोजना देण्‍यावर लक्ष केंद्रित करते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button