कसोटी चॅम्पियनशिपवर भारताचा दावा कायम
चेन्नई : भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये इंग्लंडला 317 धावाने पराभूत करत आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपच्या फायलनमध्ये पोहचण्याचा दावा सुकर केला आहे. भारतीय संघ फायनल गाठण्याच्या शर्यतीत न्यूझीलंडनंतर दोन नंबर पोहचला आहे. न्युझीलंडने अंतिम फेरीमध्ये आपली जागा कायम ठेवत इंग्लंड संघ हा चौथ्या क्रमांकावर घसरला आहे.
विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीमध्ये पोहचण्यासाठी भारतीय संघाला ही मालिकेमध्ये 2-1 विजय मिळवण्याची गरज आहे. सध्या दोन्ही संघ 1-1 च्या बराबरीमध्ये असून शेवटच्या दोन कसोटी सामन्यामध्ये भारताला कमीतकमी 1 विजय तर एक मॅच ड्रॉ ठेवावी लागेल. परंतू दोन्ही सामन्यामध्ये पराभूत झाल्यास भारताला फायनलपासून वंचित राहावे लागेल.
इंग्लंडला जिंकावे लागेल दोन कसोटी सामने
इंग्लंड संघाला टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीमध्ये पोहचण्यासाठी या मालिकेत दोन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे. कारण यापूर्वीच या संघाचे दोन्ही पर्याय संपले आहेत.
भारत-इंग्लंड संघाच्या मालिकेतील काही निकालामुळे ऑस्ट्रेलिया संघही चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहचू शकतो. ही मालिका जर आता 2-2 किंवा 1-1 अशी राहिली तर ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये पोहचू शकतो. याखेरीज इंग्लंडच्या संघाने ही मालिका २-1 ने जिंकल्यास तरीपण ऑस्ट्रेलिया संघाला अंतिम फेरी गाठता येणार आहे.
लॉर्डसवर 18 जूनला अंतिम फेरी
आयसीसीने पहिल्या वेळेस विश्व कसोटी चॅम्पियनशिपचे आयोजन केले असून या मालिकेची अंतिम फेरी ही 18 जून रोजी लॉर्डस क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे.