उन्नाव पुन्हा हादरले; शेतात आढळले 2 मुलींचे मृतदेह तर तिसरीची मृत्युशी झुंज
जंगलामध्ये संशयास्पद अवस्थेत तीन मुली आढळून आल्या. घटनेची माहिती मिळताच मुलींना लगेचच जवळच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र दोन मुलींना मृत घोषित करण्यात आलं. तर तिसऱ्या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला कानपूरच्या एका रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. तिन्ही मुली या आपल्या शेतात चारा आणण्यासाठी गेल्या होत्या. त्याच दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच डीएम आणि अन्य अधिकारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहे.
गाव आणि रुग्णालय परिसराच्या आसपास पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी असोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन मुली शेतात संशयास्पद अवस्थेत आढळून आल्या आहेत. सध्या या प्रकरणात अनेकांची अधिक चौकशी केली जात असून वेगाने तपास करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. या घटनेनंतर परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून खळबळ निर्माण झाली आहे. तर मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी या तिघी जणी चारा आणण्यासाठी शेतात गेल्या असल्याचं म्हटलं आहे.