Uncategorized

नवज्योत सिंग सिद्धूचे पाकशी कनेक्शन; अमरिंदर सिंग यांचा धक्कादायक आरोप

चंदिगढ : अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर धक्कादायक आरोप केला आहे. एएनआयने यासंदर्भात ट्विट केलं आहे. त्यांनी केलेल्या ट्विटनुसार, नवज्योत सिंग सिद्धू यांची पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावर निवड करण्यास अमरिंदर सिंग यांनी विरोध दर्शवला आहे. ते म्हणाले, नवज्योत सिंग सिद्धू मुख्यमंत्रिपदासाठी सक्षम नाही. ते देशासाठी आपत्ती ठरतील. त्याचं नाव पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावर घेण्यास माझा नकार आहे. त्यांचे पाकिस्तानशी संबंध आहेत. त्यामुळे देशाचा सुरक्षेसाठी हे धोकादायक आहे, अशा शब्दात अमरिंदर सिंग यांनी आपला राग व्यक्त केला.

पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या ओढाताणीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना राजीनामा द्यावा लागला आहे. पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सुनील जाखड, सुखजिंदर रंधवा आणि प्रताप सिंह बाजवा यांची नावे आघाडीवर आहेत. याशिवाय नवज्योत सिंग सिद्धू यांचंही नाव नव्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत घेतलं जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button