आरोग्य

‘अपोलो २४।७’कडून भारतीयांना हेल्‍थकेअर सेवा देण्‍यासाठी मायक्रोसॉफ्ट अझुरचा वापर

नवी दिल्‍ली : अपोलो हॉस्पिटलने त्‍यांचा ओम्‍नी-चॅनेल हेल्‍थकेअर व्‍यासपीठ अपोलो २४।७ च्‍या देशव्‍यापी सादरीकरणासह उपस्थितीमध्‍ये वाढ केल्‍याची घोषणा केली. हे व्‍यासपीठ मायक्रोसॉफ्ट अझुरच्‍या क्षमतांचा वापर करत भारतामध्‍ये शेवटच्‍या अंतरापर्यंत आरोग्‍यसेवा देते. नाविन्‍यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करत जागतिक दर्जाचे हेल्‍थकेअर सोल्‍यूशन्‍स देण्‍याच्‍या दृष्टिकोनासह हे व्‍यासपीठ वेबसाइट व मोबाइलवर उपलब्‍ध असलेल्‍या वापरण्‍यास सुलभ अशा इंटरफेसच्‍या माध्‍यमातून देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचू शकते. व्‍यासपीठामध्‍ये अपोलो ग्रुपच्‍या व्‍यापक भौतिक नेटवर्क व क्षमतांसह व्‍यापक व वैशिष्‍ट्यपूर्ण डिजिटल इकोयंत्रणेचा समावेश आहे. ज्‍यामध्‍ये ऑनलाइन मेडिसीन डिलिव्‍हरी, व्‍हर्च्‍युअल डॉक्‍टर कन्‍सल्‍टेशन, ऑनलाइन डायग्‍नोस्टिक टेस्‍ट बुकिंग, आजाराचे व्‍यवस्‍थापन आणि पर्सनल हेल्‍थ रेकॉर्ड मेन्‍टेनन्‍स अशा सेवांचा समावेश आहे.

अपोलो हॉस्पिटल्‍सच्‍या कार्यकारी उपाध्‍यक्ष शबाना कामिनेनी म्‍हणाल्‍या, ”आम्‍हाला भारतातील आरोग्‍यसेवेमध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणण्‍याच्‍या आमच्‍या प्रयत्‍नाला आणि अपोलो २४।७ व्‍यासपीठाला महत्त्वपूर्ण पाठिंबा देण्‍यास साह्य करण्‍यासाठी मायक्रोसॉफ्ट आमच्‍यासोबत असण्‍याचा आनंद होत आहे. आम्‍ही युजरची गोपनीयता व सुरक्षिततेबाबत कोणतीच तडजोड न करता एकसंधी ग्राहक अनुभव देण्‍यामध्‍ये यशस्‍वी ठरलो आहोत.”

न्‍यू नॉर्मलमध्‍ये हेल्‍थकेअरबाबत पुनर्विचारासह रूग्‍ण केअर व स्‍वास्‍थ्‍याच्‍या बदलत्‍या अपेक्षांमुळे टेलि-हेल्‍थ प्रक्रियेमध्‍ये झपाट्याने परिवर्तनाला चालना मिळाली आहे. अपोलो २४।७ प्रत्‍येक ग्राहकाला परिपूर्ण वैयक्तिकृत अनुभव देण्‍यासाठी विविध माहिती स्रोतांची सेवा देते. कनेक्‍टेड डिवाईसेस, क्‍लाऊड-समर्थित क्लिनिकल इंटेलिजन्‍स व्‍यासपीठ आणि ऑनलाइन पर्सनल हेल्‍थ रेकॉर्डसचा वापर करत अपोलो २४।७ व्‍यासपीठ भावी ग्राहक-केंद्रित आरोग्‍य इकोयंत्रणेची सुविधा देते.

देशभरातील अपोलो हॉस्पिटल्‍स व क्लिनिक्‍समधील ७,००० हून अधिक डॉक्‍टरांच्‍या नेटवर्कचे पाठबळ असलेले अपोलो २४।७ व्‍यासपीठ १५ मिनिटांमध्‍ये अपोलो प्रमाणित डॉक्‍टर्सकडून दिवसभर व्‍हर्च्‍युअल कन्‍सल्‍टेशन्‍स उपलब्‍ध करून देते. भारतामध्‍ये ४००० हून अधिक स्‍टोअर्स असलेले व्‍यासपीठ निवडक शहरांमध्‍ये दोन तासांमध्‍ये डिलिव्‍हरी देण्‍याच्‍या खास वचनासह भारतातील १५,००० ठिकाणी एकसंधी मेडिसीन डिलिव्‍हरीज सेवा देते. यामध्‍ये भारतातील एकमेव व्‍यापक आजार व्‍यवस्‍थापन सोल्‍यूशनचा देखील समावेश आहे, ज्‍यासोबत स्‍वास्‍थ्‍य व क्लिनिकल सल्‍ले देखील दिले जातात. युजर्स व्‍यासपीठावर जलदपणे मानसिक आरोग्‍याची तपासणी करू शकतात आणि आरोग्‍य व स्‍वास्‍थ्‍यासंदर्भातील ब्‍लॉग्‍स वाचू शकतात.

महामारीचा प्रादुर्भाव असल्‍यामुळे व्‍यासपीठ कोरोनाव्‍हायरस कफ व रिस्‍क स्‍कॅनर, कोविडनंतर घ्‍यावयाची काळजी याबाबत माहिती देण्‍यासोबत लसींबाबत माहिती देत आहे. अपोलो २४।७ प्री-क्लिनिकल आरोग्‍य गरजा आणि लक्ष्‍य आरोग्‍य विमा प्रोग्राम्ससाठी लवकरच एआय-आधारित हेल्‍थ प्रेडिक्‍टर, स्‍वास्‍थ्‍य भागीदार अशा ऑफरिंग्जचा समावेश करणार आहे.

मायक्रोसॉफ्ट इंडियाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक सशीकुमार श्रीधरन म्‍हणाले, ”बदलत असलेल्‍या हेल्‍थकेअर वातावरणामध्‍ये मायक्रोसॉफ्टचे कंपन्‍यांना स्थिरता व भविष्‍याबाबत पुनर्विचारामध्‍ये मदत करण्‍याचे मिशन आहे. विश्‍वसनीय क्‍लाऊडसह अपोलो २४।७ रूग्‍णाचा सहभाग लक्षणीयरित्‍या वाढवू शकते आणि रूग्‍णाच्‍या उत्तम निष्‍पत्तींसाठी सर्वोत्तम आरोग्‍य माहिती सांगू शकते.”

पोस्‍टग्रे एसक्‍यूएल, अझुर कुबर्नेट्स सर्विसेस आणि अझुर डेव्‍हऑप्‍ससाठी अझुरे डेटोबेसचा वापर करत मोठ्या प्रमाणातील उपयोगाकरिता निर्माण करण्‍यात आलेले व्‍यासपीठ रूग्‍णांना हेल्‍थकेअर सेवांची एकीकृत सुविधा उपलब्‍ध होण्‍यामध्‍ये आणि सुरक्षितपणे व्‍यवहार करण्‍यामध्‍ये सक्षम करते. व्‍यासपीठ चॅट, वॉइस, व्हिडिओ व टेक्‍स्‍ट मॅसेजिंगसह मोठ्या प्रमाणात संपन्‍न व सुरक्षित कम्‍युनिकेशन अनुभव निर्माण करण्‍यासाठी अझुर कम्‍युनिकेशन्‍स सर्विसेसचा देखील वापर करेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button