अंमली पदार्थांचा विळखा कायम

सुशांतसिंग राजुपतच्या आत्महत्या प्रकरणानंतर मुंबई, गोवा, कर्नाटक आदी ठिकाणाहुन मोठया प्रमाणात अंमली पदार्थांचे साठे हस्तगत करण्यात आले होते. या अवैध व्यवसायात असणाºया अनेक कलाकार, उद्योजक, ड्रग पेडलर अशा शेकडोंना ताब्यातही घेण्यात आले. याच चौकशीदरम्यान अंमली पदार्थ विरोधी पथकावर ड्रग पेडलरनी प्राणघातक हल्लाही केला होता. या चौकशीदरम्यान दोन अधिकाºयांचे निलंबनही करण्यात आले आहे. इतक्या कठोर कारवाईनंतरही मुंबईसह राज्यावर असणारा अंमली पदार्थांचा विळखा कायम असल्याचेच वास्तव सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशीही कायम आहे. मुंबईत अनेक हॉटेल्स, पब, रेस्तरॉ आदी ठिकाणी राजरोजपणे बंदी असणारा हुक्का पार्लर रंगतो आहे. विशेष म्हणजे अशा ठिकाणी येणाºया ग्राहकांमध्ये अल्पवयीनांची संख्या चिंताजनक आहे. राज्यसरकारने अशा बड्या धेंडयाच्या नाईट पार्ट्यांना सुरक्षितता देण्यासाठीच जणू नाईट कर्फ्यूचे आदेश दिले असावेत, असे वातावरण मुंबईतलया अलिशान एरीयात फिरताना लक्षात यावे. सध्या राज्यातील गुन्हेगारी विश्वावर नजर टाकली तर हेच लक्षात येते की, छोट्या मोठया गावात, शहरात अवैधरीत्या देशी, विदेशी मद्याचे साठे मोठया प्रमाणात पकडले जात आहेत. अनेक ठिकाणचे देशी दारुचे अड्डे पालिसांनी उध्वस्त केले आहेत. डिसेंबरच्या नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई, गोवा, पूण्यासह राज्यात अनेक ठिकाणी पार्ट्या आणि जल्लोषाचे आयोजन केले जाते. यंदा जाहिर जल्लोष नसला तरीही हा उन्माद सुरुच राहणार आहे. लॉकडाउनच्या काळात कमी प्रमाणात झालेली अंमली पदार्थांची वाहतूक नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यात राज्यातील विविध भागात मोठया प्रमाणात आढळून आली. मुंबईत सर्वच दिशांनी येणाºया अंमली पदार्थांना जरी मुंबई पोलिस रोखू शकले नसले तरीही, डिसेंबर अखरेपर्यंत मुंबई आणि राज्य पोलिसांनी केलेल्या कारवाईतगत वर्षीच्या तुलनेत मोठया प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. कोकेन, हेरॉईन या स्टॅÑॉंग नशिल्या पदार्थांची तहान अफू, गांजा, आणि चरस या सहज उपलब्ध होणाºया नशिल्या पदार्थांवर भागवण्याचे प्रमाणही तीव्रतेने वाढले आहे. राज्यात मुंबईपासून अगदी धुळयासारख्या शहरापर्यंत सर्वच ठिकाणांतून गत तीन महिन्यात करोडो रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. या गांजाचा साठा आणि अवैध विक्री करणाºया डॉन मंडळींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नुकतेच अंबरनाथ, मीरा भायंदर, ठाणे, कल्याण, पनवेल आदी ठिकाणच्या हुक्का पार्लरवरही पोलिसांनी छापे टाकले आहेत. हुक्का पार्लरला बंदी असतानाही, संचारबंदीच्या काळात हे हुक्कापार्लर बिनदिक्कत सुरु होते. महाराष्टÑासह देशांत विविध मार्गाने येणारा अंमली पदार्थांचा साठा लॉकडाउन आणि वाहतूक बंद असल्याने कमी झाला होता पण तो बंद झाला नव्हता. भारतात मुंबईससह इतर मोठया शहरांत कोकेन आणि हेरोइन तस्करीसाठी सर्वाधिक हवाई मार्गाचा वापर केला जातो. लॉकडाऊन दरम्यान हवाई मार्ग बंद झाल्यामुळे गदुर्ल्यांना जुन्या स्टॉकवरच समाधान मानावे लागत होते. मुंबईत लॉकडाउनमुळे हॉटैल, पब, डान्सबार, नाईट लाईफ आणि पेज थ्री पार्ट्यां बंद असल्याने अंमली पदार्थांचा व्यवहारही काही प्रमाणात थंडावला होता, आता हे सगळं काही सुरु झाल्याने अंमली पदार्थंची वाहतूकही छाुप्या मार्गाने सुरु झाली आहे. भारतात समुद्रामार्गे, रस्ता मार्गे अंमली पदार्थांची वाहतूक होवू शकते या शक्यतेने पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. नुकतेच समुद्रीमार्गाने भारतात येणाºया कोट्यावधी किंमतीचे अमंली पदार्थांचे कंटेनर जप्त करण्यात आले आहेत. तर अहमदाबाद, राजस्थान व लखनऊ याठिकाणी संचारबंदी काळातील अत्यावश्यक सेवा पासचा गैरवापर करत अंमली पदार्धांची तस्करी करणारे अनेक ट्रक जप्त करण्यात आले आहेत. लॉकडाऊन दरम्यान झारखंडहून सर्वात जास्ती अंमली पदार्थांची तस्करी झाल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊन काळात झारखंडच्या तस्करांनी मोठ्या प्रमाणात अफूचा पुरवठा सुरू केला आहे. दिल्ली एनसीआरमध्ये गांजाचा सर्वाधिक पुरवठा हा आंध्रप्रदेश व ओडिशा राज्याच्या सीमाभागातून अधिक प्रमाणात होत असल्याचे दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या एका तपासात समोर आले आहे. सीमालगतच्या भागात स्वस्त दरात गांजा हा पुरवठादारांना मिळत असतो. त्यामुळे दिल्ली-एनसीआर, हरियाणा, राजस्थान आणि पंजाब येथील तस्कर तेथूनच गांजाची तस्करी करत असल्याचे उघड झाले आहे. देशभरात ज्या पद्धतीने ड्रग्सचा व्यवसाय वाढत आहे त्या कारणामुळे सर्व सरकारी एजन्सींची चिंताही वाढत आहे. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे एजन्सी्दवारा फक्त तीन ते पाच टक्के अंमली पदार्थ तस्करांकडून हस्तगत करतात. जागतिक अंमली पदार्थांबाबतचा उत्पादन, विक्री आणि वाहतूक यावर प्रकाश टाकणारा 2020 च्या अहवालानुसार, कोरोनाच्या जागतिक आरोग्य आणीबाणीच्या काळात आर्थिक गर्तेत अडकलेल्या या व्यवसायातील संबधितांनी पर्याय शोधायला सुरुवात केली आहे. इटली, नायजेरीया आणि मध्य आशियातील अंमली पदार्थांचे मुख्य स्त्रोत असणाºया देशांत नशिल्या पदार्थांच्या तस्करीत मोठया प्रमाणात कपात झाली आहे. यामुळे हा तोटा भरुन काढण्यासाठी यातील अपराध्यांनी आपला मोर्चा आता सायबर गुन्हे, आॅनलाईन आर्थिक फसवणूकीकडे तसेच बनावट औषध निर्मितीकडे वळवला आहे. जागतिक संचारबंदीमुळे देशातंर्गत आणि बाहेरील प्रवासावर निर्बंध आले, यामुळे चोरटी विमान वाहतूक, रेल्वे प्रवासही थांबले आहेत. यामुळे आंतररराष्टÑीय अंमली पदार्थांच्या आयात निर्यातीवरही परीणाम झाला आहे. मात्र संचारबंदी आणि कोरोनामुळे झालेला तोटा अंमली पदार्थ विक्रेते सध्या गांजा, अफूच्या तस्करीतून भरुन काढण्यासाठी सज्ज झालेले ठिकठिकाणी पहायला मिळत आहेत. संयुक्त राष्टÑ अंमली पदार्थ आणि अपराध कार्यालयाच्या पाहणीनुसार, भारत हा अंमली पदार्थ विक्रेत्यांसाठी एक मोस्ट वॉन्टेट हब आहे. अंमली पदार्थांचा विळखा फक्त महाविद्यालयीन तरुणांभोवतीच नाही तर तो संपुर्ण समाजाला पोखरतो आहे. दिवसंदिवस यातील आरोपींची कार्यपद्धती बदलत चालली असल्याने यांची पाळेमुळे शोधून त्यांचा नायनाट करणे, हे आव्हान पोलिस यंत्रणेसह समाजापुढे उभे ठाकले आहे.अंमली पदार्थांपासुन आपण खरेच तरुण पिढी आणि समाजाला वाचवु शकणार का, असा प्रश्न उदविग्न करतो आहे. जागतिक स्वास्थ्य संस्थेच्या माहितीप्रमाणे अंमली पदार्थाच्या पहिल्या अनुभवाचे वय भारतात 2006 मध्येच १६ व्या वर्षांपर्यंत घसरले होते. आता ते 10 ते 14 पर्यंत आले आहे. आपल्या देशात लोकसंख्येच्या जवळजवळ २५% मुले १०-१४ वर्षे वयोगटातील आहेत. माध्यमिक शाळांमधून तंबाखू, सिगारेट, दारू, चरस आणि गांजा यांचा वापर सर्रास होत नसला तरी गेल्या १० वर्षांत वाढताना दिसत आहे. राज्यातील विविध भागात अफू, चरस, गांजा यासह मेफ्रेडोनसारख्या अंमली पदार्थांची खुलेआम विक्री होत असताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरी भागातील उच्चभ्रू व्यक्ती मोठया प्रमाणात या व्यसनात गुरफटत चालले आहेत. पोलिसांच्या कारवाईनंतर छुप्या पद्धतीने महाग दरात अमली पदार्थ विकले जातात, ते परवडत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या करणाºयांची मोठी संख्या आहे.अमली पदार्थाची व्यसनाधीनता हा जगापुढे असलेला आरोग्याचा एक अतिशय गुंतागुंतीचा प्रश्न आहे. अमली पदार्थाच्या सेवनाने निर्माण होणारे आजार, व्यसनाधीन व्यक्तीच्या कुटुंबाला सोसावा लागणारा आर्थिक आणि मानसिक बोजा, अमली पदार्थ मिळवण्यासाठी पत्करले जाणारे धोके आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम, असे या सामाजिक प्रश्नाचे विविध आयाम आहेत.