शिक्षण

‘व्हाइटहॅट ज्युनियर’ची प्रगत अध्ययन संधी देण्यासाठी ‘एण्ड्युरोसॅट’शी भागीदारी

मुंबई : व्हाइटहॅट ज्युनियर या कोडिंग व गणिताचे १:१ लाइव्ह ऑनलाइन क्लासेस घेण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आघाडीच्या एड्युटेक कंपनीने एण्ड्युरोसॅट (EnduroSat) या आघाडीच्‍या स्‍पेस कंपनीशी बहुवर्षीय भागीदारी केली आहे. या करारात डिसेंबर २०२१ मध्ये एक उपग्रह अवकाशात सोडण्याचा समावेश आहे. याचा पेलोड व्हाइटहॅट ज्‍युनियरशी समर्पित असेल आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना अवकाशाशी संबंधित रोमांचक अध्ययनाच्या संधी मिळतील. याशिवाय व्हाइटहॅट ज्युनियरच्या विद्यार्थ्यांना जून २०२१ मध्ये अवकाशात सोडल्या जाणाऱ्या आणखी एका उपग्रहाचा प्रायोगिक तत्त्वावर अ‍ॅक्सेसही दिला जाणार आहे. हे दोन्ही उपग्रह स्पेसएक्स (SpaceX) फाल्कन ९ राइडशेअरचा लाभ घेणार आहेत.

व्‍हाइटहॅट ज्‍युनियर आणि एण्‍ड्युरोसॅट यांच्‍यामधील हा अनोखा सहयोग विद्यार्थ्‍यांसाठी लक्षवेधक उपयोजित विज्ञान संधींची निर्मिती करेल. यामुळे विद्यार्थ्यांना आज्ञांचे प्रेषण करण्याचा तसेच अवकाशात सोडलेल्या उपग्रहामार्फत येणारा डेटा अॅक्सेस करण्याची संधी मिळेल. सेन्सर डेटाच्या विश्लेषणापासून (प्रत्येक उपग्रहावर ३० हून अधिक सेन्सर्स ऑनबोर्ड असतात, यामध्ये इन्फ्रारेड, तापमान घेणारे सेन्सर्स, सन सेन्सर्स, जायरोस्कोप आदींचा समावेश असतो) ते कॅमेरांच्या (अवकाशातील विविध घटकांचे फोटो घेणारे) नियंत्रणापर्यंत उपयोजित विज्ञानाच्या असंख्य संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. याशिवाय हा स्‍पेस डेटा व्हाइटहॅट ज्युनियरच्या पेलोड कम्प्युटरवर (मुख्य ऑनबोर्ड कम्प्युटरशी थेट जोडलेला रासबेरी पाय ४) वेगवेगळ्या मार्गांनी संयोजित करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळणार आहे. हे सगळे अध्ययन अनुभव व्हाइटहॅट ज्युनियरच्या अभ्यासक्रमात अखंडितपणे समाविष्ट केले जाणार आहेत आणि विद्यार्थ्यांना अधिकाधिक रस वाटावा या हेतूने तयार केल्या जाणाऱ्या गेमिफाइड कंटेण्टप्रमाणेच हा कंटेण्ट ठेवला जाणार आहे.

आम्ही कायमच शोधाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या सृजनाच्या शक्तीवर विश्वास ठेवत आलो आहोत. विद्यार्थ्यांना स्पष्ट दिसणाऱ्या गोष्टींपलीकडील विचार करण्याची किंवा अगदी शब्दश: सांगायचे तर ताऱ्यांपलीकडील ध्येय ठेवण्याची क्षमता देण्याच्या आमच्या प्रयत्नांचे उदाहरण म्हणजे ही भागीदारी होय, असे व्हाइटहॅट ज्युनियरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी करन बजाज म्हणाले. आमच्या विद्यार्थ्यांना अध्ययनाची ही अनोखी संधी देणे आमच्यासाठी थरारक अनुभव आहे आणि ही पद्धत जगभरात लोकप्रिय करण्यासाठी अनेकविध धोरणात्मक व कॉर्पोरेट भागीदारांना सहभागी करून घेण्याच्या प्रक्रियेतून आम्ही जात आहोत.

व्हाइटहॅट ज्युनियरसोबत भागीदारी केल्यामुळे आम्ही खरोखर रोमांचित झालो आहोत. मुलांमध्ये अगदी लहान वयापासून शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी समर्पितपणे काम करणारा सहयोगी लाभलेले आमचे हे पहिलेच मिशन आहे. अवकाश शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचा एण्ड्युरोसॅटने कायमच पुरस्कार केला आहे आणि आमच्या स्वत:च्या स्पेसपोर्ट अकॅडमीद्वारे (Spaceport Academy) हे शिक्षण सर्वांना उपलब्धही करून दिले आहे, असे एण्ड्युरोसॅटचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रायचो रायचेव यांनी सांगितले. या मिशनमुळे अवकाशप्रेमींच्या एका नवीन पिढीला प्रेरणा मिळेल अशी आशा आम्हाला वाटते. आम्‍ही ही बाब हजारो मुलांसोबत शेअर करण्‍यास खूपच उत्‍सुक आहोत, असे एण्ड्युरोसॅटचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रायचो रायचेव यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button