अर्थ-उद्योग

‘वी’ची आदित्य बिर्ला हेल्थ इन्श्युरन्ससोबत भागीदारी

मोबाईल रिचार्जेसवर आरोग्य विमा लाभ मिळवून देण्यासाठी 'वी'चा उपक्रम

–        मोबाईल उद्योगक्षेत्रात प्रथमच प्रस्तुत आहे वी हॉस्पिकेयर ५१ आणि ३०१ रुपयांच्या रिचार्जवर; आरोग्य विमा संरक्षण ज्यांच्याकडे नाही अशा बहुसंख्य भारतीय युजर्सना मिळणार रिचार्जमध्ये समाविष्ट असलेले आरोग्य विमा लाभ

–        या प्लॅन्सचे सब्स्क्रिप्शन ज्या वी युजर्सनी घेतले असेल त्यांना आदित्य बिर्ला हेल्थ इन्श्युरन्सकडून वैद्यकीय अडीअडचणीच्या (यामध्ये कोविडचा देखील समावेश आहे) काळात हॉस्पिटलायझेशनसाठी दर दिवशी १००० रुपयांचे आणि आयसीयु खर्चांवर दर दिवशी २००० रुपयांचे विमा संरक्षण मिळणार

देशाची सामाजिक आर्थिक घडी विस्कटून टाकण्यात असंभावित आजारांच्या प्रभावांचा किती मोठा हात असू शकतो हे सध्याच्या महामारीने आपल्याला चांगलेच दाखवून दिले आहे.  नॅशनल सर्व्हे रिपोर्टनुसार (जुलै २०२० मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या), भारतात गावांमध्ये फक्त १४% तर शहरांमध्ये फक्त १९% लोकांकडे आरोग्य विमा संरक्षण होते. भारतातील बहुसंख्य जनतेसाठी आरोग्य विम्याबाबत जागरूकतेचा अभाव आणि महागडे वैद्यकीय खर्च यामुळे खूप मोठे आर्थिक संकट ओढवणे साहजिकच आहे.

भारतातील आघाडीची टेलिकॉम ऑपरेटर कंपनी वी ने आदित्य बिर्ला हेल्थ इन्श्युरन्ससोबत वी हॉस्पिकेयर ही अशाप्रकारची पहिलीच अनोखी सेवा सुरु केली आहे.  वी प्रीपेड ग्राहकांना यामधून हॉस्पिटलायझेशन कव्हर पुरवले जाईल. वी हॉस्पिकेयरमध्ये वी ग्राहकांना २४ तासांच्या हॉस्पिटलायझेशनसाठी १००० रुपयांपर्यंतची आणि आयसीयु खर्चांसाठी २००० रुपये निश्चित रक्कम एबीएचआयकडून मिळेल.  या योजनेमध्ये कोविड-१९ किंवा आधीपासून काही आजार असल्यास त्यांच्याही हॉस्पिटलायझेशनचा समावेश करण्यात येतो.  ५१ आणि ३०१ रुपयांच्या दोन वेगवेगळ्या, किफायतशीर रिचार्जेससोबत वी प्रीपेड ग्राहकांच्या मोठ्या संख्येला वी हॉस्पिकेयरमध्ये एकत्रित करण्यात आलेल्या आरोग्य विमा सुविधांचे लाभ मिळू शकतील.

रिचार्ज किंमत आरोग्य लाभ टेलिकॉम लाभ वैधता
रु. ५१ दर दिवशी १००० रुपये ५०० एसएमएस मोफत २८ दिवस
रु. ३०१ दर दिवशी १००० रुपये अनलिमिटेड कॉल्स + दर दिवशी १.५ जीबी डेटा + २ जीबी अतिरिक्त + १०० एसएमएस दर दिवशी २८ दिवस

आयसीयुमध्ये उपचार घेत असल्यास, त्या ग्राहकांना दुप्पट म्हणजे दर दिवशी २००० रुपये विमा संरक्षण मिळेल.

वी हॉस्पिकेयरची वैशिष्ट्ये:

वैशिष्ट्ये तपशील
दैनंदिन रोख लाभ दर दिवशी १००० रुपये
आयसीयु उपचार आयसीयु उपचारांसाठी दर दिवशी २००० रुपये
संरक्षण कालावधी   ५१/३०१ च्या प्रत्येक सातत्यपूर्ण रिचार्जवर विमा संरक्षण २८ दिवसांनी वाढते.
वयोगट १८ ते ५५ वर्षे
प्रत्येक हॉस्पिटलायझेशनसाठी मर्यादा प्रत्येक वेळी १० दिवस
प्रत्येक पॉलिसी वर्षासाठी मर्यादा प्रत्येक वर्षी ३० दिवस
वजा करण्यायोग्य १ दिवस
पहिल्या ३० दिवसांचा वेटिंग कालावधी लागू आहे
अपघाताच्या केसेससाठी वेटिंग कालावधी लागू नाही
विशिष्ट आजारांसाठी दोन वर्षांचा वेटिंग कालावधी लागू नाही
आधीपासूनच्या आजारांसाठी वेटिंग कालावधी लागू नाही

 

वी चे सीएमओ श्री. अवनीश खोसला यांनी हॉस्पिकेयर या उपक्रमाविषयी सांगितले, “आमच्या ग्राहकांना अधिक जास्त सक्रिय आणि कार्यक्षम राहता यावे यासाठी मदत करण्यासाठी वी मध्ये आम्ही सतत प्रयत्नशील असतो.  १०० कोटींपेक्षा जास्त भारतीय मोबाईल फोन युजर्ससाठी अधिक चांगले भविष्य निर्माण करण्यासाठी नाविन्यपूर्णकिफायतशीर सुविधा आणण्यावर आमचा भर असतो.  आमच्या ग्राहकांना लाभदायकमूल्यवर्धक सुविधा देण्यासाठी आमच्या सहयोगात्मक कार्यक्रमांतर्गत आदित्य बिर्ला हेल्थ इन्श्युरन्ससोबत आम्ही वी हॉस्पिकेयर हा उपक्रम सुरु करत आहोत.  वीमध्ये आम्ही आरोग्य आणि कल्याण यांना प्राधान्य देतोया भागीदारीमुळे आम्हाला आमच्या युजर्सचे  हॉस्पिटलायझेशनचे असंभावित आर्थिक ओझे हलके करता येईल.  मला खात्री आहे कीया अतिशय सहजसोप्याकोणतेही छुपे खर्च नसलेल्या आणि प्रभावी लाभ मिळवून देणाऱ्या सुविधेमुळे सर्व सामाजिक स्तरांमधील आमच्या प्रीपेड ग्राहकांना खूप मोठी मदत मिळेल.  

 

या भागीदारीबद्दल आदित्य बिर्ला हेल्थ इन्श्युरन्सचे सीईओ श्री. मयांक बाठवाल यांनी सांगितले, वैद्यकीय खर्चांचे नियोजन नसल्यामुळे कशी समस्या उद्भवू शकते आणि लोकांना आपल्या बचतीमधून हे खर्च भागवावे लागतात हे आपल्या देशात दिसून आले आहे. हे खर्च म्हणजे खूप मोठे आर्थिक ओझे ठरू शकतेतर यामुळे काही लोकांना गंभीर आर्थिक ओढग्रस्तीला देखील सामोरे जावे लागू शकते.  आदित्य बिर्ला हेल्थ इन्श्युरन्समध्ये आम्ही असे मानतो की आरोग्य विमा संरक्षण सर्वांना मिळाले पाहिजे आणि किफायतशीर किमतीमध्ये सर्वांना त्यांच्या गरजांनुसार आरोग्य विमा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो.  वी हॉस्पिकेयर हे सहज मिळू शकेल असे आरोग्य विमा संरक्षण ठरेल आणि यामध्ये विमा दावे देखील अगदी विनासायास पद्धतीने निकाली काढले जातात.  विविध आर्थिक स्तरातील ग्राहकांना सहजसोप्या पद्धतीने आरोग्य विमा सुविधा मिळाव्यात ही आमची वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी आवश्यक विस्तार साध्य करण्यासाठी वी सोबतच्या भागीदारीचा खूप फायदा होणार आहे.”

 

आदित्य बिर्ला हेल्थ इन्श्युरन्सकडून दिले जाणारे विमा संरक्षण हे नोंदणीकृत सरकारी रुग्णालये, ऍलोपॅथी/आयुष रुग्णालये यांसह सर्व रुग्णालयांमध्ये लागू आहे. यामध्ये अतिशय सहजसोप्या पद्धतीने फक्त डिस्चार्ज सर्टिफिकेटची स्कॅन केलेली प्रत दाखवून आणि पडताळणी करवून घेऊन वी ग्राहकांना विमा संरक्षणाचे लाभ मिळण्यासाठी दावा दाखल करता येतो.

या उपक्रमाबद्दल अधिक जास्त माहिती तसेच अटी जाणून घेण्यासाठी कृपया या लिंकवर भेट द्या:      bit.ly/ViHospicare

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button